April 25, 2025

वैद्यकीय अधिकारी अडकला एसीबी च्या जाळ्यात; दुर्गम भागात गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाही

गडचिरोली, २६ मार्च  : जिल्ह्यातील नक्षलग्रस्त आणि अतिसंवेदनशील भागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करतप्राथमिक आरोग्य केंद्र, लाहेरी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. संभाजी भोकरे (वय ३६ वर्ष वर्ग-1) यांना १.३० लाख रुपयांची लाचरकमेची मागणी केल्याने अटक केली आली आहे. सदर कारवाई २६ मार्च रोजी करण्यात आली. सदर कारवाईने आरोग्य विभागातखळबळ उडाली आहे.

तक्रारदाराच्या फेब्रुवारी २०२४ ते सप्टेंबर २०२४ आणि नोव्हेंबर महिन्यातील १४ दिवसांच्या रोखलेल्या पगाराच्या बिलावर सहीकरण्यासाठी डॉ. भोकरे यांनी १.५० लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर १.३० लाख रुपयांवर सौदा ठरला. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारेपोलीस उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष पाटील, शिवाजी राठोड आणि त्यांच्यापथकाने अत्यंत गोपनीय तपास करुन सापळा रचला. ठरल्याप्रमाणे, आरोपीने लाचेची मागणी केल्यावर तात्काळ कारवाई करतत्याला अटक करण्यात आली. याबाबत गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हा परिसर नक्षल चळवळीने प्रभावित असूनही, पोलिसांनी धाडसी कारवाई केली. या घटनेमुळे भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाधडा मिळणार असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना भ्रष्टाचाराविरोधात तत्काळ तक्रार करण्याचे आवाहनलाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली यांनी केली आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!