May 9, 2025

‘त्या’ १२ मीटर सर्विस रोड वरील अतिक्रमण सत्तेशी संबंधित माजी नगराध्यक्षांचा; म्हणून रस्ता मोकळा करण्यास नगरपंचायत प्रशासन दिरंगाई करतेय का ?

कुरखेडा; २८ मार्च : कुरखेडा नगरपंचायत हद्दीतील गांधीवार्ड प्रभाग क्रमांक ९ मधे नाली बांधकाम वरून सुरू झालेला वाद आता अवैध दुकान चाळ बांधकामापर्यंत पोहोचला आहे. ज्या सर्व्हेक्रमांक ७५/१ विषयी येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना येथील नागरिकांनी तक्रार केल्यानंतर निर्गमित केलेल्या पत्रात अवैध बांधकाम काढून घेण्याचे निर्देश येथील तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे. आता एक धक्कादायक सत्य या प्रकरणात उघड झाले असून अतिक्रमण करून बांधकाम केलेल्या त्या मालमत्ता ७/१२ वर कुरखेड्याचे पहिले नगराध्यक्ष होण्याचा बहुमान मिळविलेल्या महेंद्र मोहबंसी व त्यांचे इतर दोन भावांची नावाची नोंद आहे.

१२ मीटर सर्विस रोड वरील अतिक्रमण व बांधकाम सत्तेशी संबंधित माजी नगराध्यक्षांचा असल्यामुळेच नगरपंचायत प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या दबावात काम करत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. अतिक्रमण न काढता नागमोडी नाली बांधकाम करण्यावरून सुरू झालेला वाद आता रस्त्याच्या पलीकडे असलेल्या दुकान चाळी पर्यंत पोहोचला आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्रकरणाची दाखल घेत तहसीलदार व मुख्याधिकारी यांना पत्र निर्गमित केले आहे. सदर पत्राच्या बाबतीत  किती गांभीर्य संबंधित प्रशासन दाखवते व कधी कार्यवाही करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्याधिकारी यांना तक्रार करून एक महिना लोटला तरी अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करण्यास  नगरपंचायत प्रशासन दिरंगाई करत असल्याने सर्वस्तरावातून नगरपंच्यातच्या कार्यशैलीवर ही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दोन दिवसा पूर्वी अतिक्रमण संदर्भात तक्रार नोंदवलेल्या प्रभाग क्रमांक ९ च्या नागरिकांनी येथील मुख्याधिकारी पंकज गावंडे यांच्या दालनात त्यांची भेट घेवून कार्यवाहीत दिरंगाई बाबत प्रश्न उपस्थित केला होता. मुख्याधिकाऱ्यांनी मार्च एनडिंगचा कारण समोर करत सर्व कर्मचारी कर वसुली कामात व्यस्त असल्याने १ एप्रिल नंतर नक्की अतिक्रमण काढण्याची कार्यवाही होईल असे आश्वस्त केले आहे. नागरिकांनी १ एप्रिल नाही तर ५ एप्रिल घ्या पण रस्त्यावर केलेले अतिक्रमण काढून न्याय करा असा आग्रही निवेदन केले आहे.

नगराध्यक्ष असतानी केले १२ मीटर सर्व्हिस रोड वर बांधकाम?

२०१५ साली कुरखेडा येथे नगर पंचायत स्थापन झाली. एका अपक्ष नगरसेवकाला आपल्या गटात घेत पहिले नगराध्यक्ष बनलेल्या येथील महेंद्र मोहबंसी यांनी आपल्या कार्यकाळात पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग करीत निवासी अकृषक आदेशात रेखांकित केलेल्या १२ मीटर सर्व्हिस रोड वर भव्यादिव्य दुकान चाळ बांधकाम केली. सोबतच याला लागून असलेले पेट्रोल पम्पला सुरक्षा भिंत उभी करत १२ मीटर जोड रस्ता ही गिळंकृत करत बांधकाम करून ६ मीटर केला. या ठिकाणी नगर पंचायतीने  सिमेंट रोड बांधकाम केले आहे. एकाबाजूने २०१७ साली नाली बांधकाम प्रस्तावित करून अतिक्रमण कायम ठेवत अर्धवट नाली बांधलेली आहे. या ठिकाणी विकास कामे करताना नगरपंचायत प्रशासनाने राजकीय दबावात अतिक्रमण काढले नाही हे आता स्पष्ट झाले आहे. २०१७ ला ही येथील नागरिकांनी अतिक्रमण काढण्या बाबत सादर केलेल्या निवेदनाची साधी दाखल ही घेतली गेली नाही.

एखाद्या लेआउट मधे विकास काम करताना नगर पंचायत येथील जागेत नकाशे व हस्तांतरित झालेले रस्ते मोजत नसेल तर विकास कोणत्या नियमाने करत आहे हे समजण्यापलीकडे आहे. नगर पंचायतीने जेव्हा या ठिकाणी सिमेंट रोड बांधला तेव्हा प्रत्यक्षात येथे किती जागा नगर पंचायतला हस्तांतरित झाली आहे हे तपासणे आवश्यक होते. पण सत्तेच्या दबावात सर्व नियम कायदे धाब्यावर बसवत येथील अतिक्रमण कायम ठेवले आहे.

नगराध्यक्ष पदावर असताना नियमानुसार तक्रार झाली असती तर ठरले असते अपात्र , नगरसेवक पद ही गमवावा लागला असता

नव्याने स्थापन झालेल्या नगर पंचायत मधे काश्य प्रकारे मनमानी कारभार सुरू आहे याचे जिवंत उदाहरण कुरखेडा येथील सत्ता समर्थकांच्या अतिक्रमण विषयात लक्ष्यात येते. लोकांना नियमांची व अधिकाराची माहिती नसली की राज्यकर्ते सत्ता अधिकारांचा कसा दुरुपयोग करतात हे दिसून येते. सध्या विरोधक नकोच या भूमिकेत असलेल्या राज्यकर्त्यांनी पंचायत पासून विधानसभे पर्यंत हातमिळवणी करून सत्ता काबीज केली आहे. या सर्वांना केवळ लोकशाही मार्गानेच नियमांवर आणता येईल. १२ मिटर सर्व्हिस रोड वर अतिक्रमण करून केले बांधकाम बाबत त्यावेळी पुरावे उपलब्ध झाले असते व नियमानुसार तक्रार झाली असती तर महेंद्र मोहबंसी यांना नगराध्यक्ष पदावरून पायउतार होत नगरसेवक पद ही गमवावा लागला असता असे जाणकारांचे म्हणणे आहे.

बांधकामाचे लेआउट अभियंता देत नाहीत का?

एखाद्या काम कंत्राटदाराला मंजूर केल्या नंतर त्याने सदर काम येथील अभियंत्याच्या निगराणीत व तांत्रिक पद्धतीने करणे अपेक्षित असते. परंतु कुरखेडा येथे होणारे नाली, रस्ता बांधकाम कंत्राटदार आपल्या मर्जीने करत तर नाही ना?येथील नळी बांधकाम करताना अतिक्रमण लक्ष्यात आल्या नंतर अभियंत्याने सदर माहिती मुख्याधिकाऱ्यांना देणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात अभियंता या ठिकाणी गेलेच नसतील का? असा ही प्रश्न उपस्थित होत आहे. कंत्राटदार स्थानिक असल्याने गाव संबंध जोपासत सत्तेशी संबंधित असलेल्या पूर्व नगराध्यक्षाच्या मर्जीने कंत्राटदार काम करत होता का? नागरिकांच्या आक्षेपांचे हेतुपुरस्पर पायमल्ली होत होती का? वरिष्ठ स्तरापर्यंत पत्रव्यवहार व पाठपुरावा केल्या नंतरच येथील नाली बांधकाम मुख्याधिकाऱ्यांनी थांबविले का? असे अनेक प्रश्न येथे उपस्थित होत आहेत.

मुख्याधिकारी म्हणतात अतिक्रमण धारकांना कसलेही झुकते माप दिले नाही, मग नाली बांधकामात लोखंडी एंगल कश्यासाठी टाकले?

मुख्याधिकाऱ्यांच्या कथनी व करणी मधे खूप अंतर असल्याचे नागरिकांना जाणवत आहे. नागरिकांच्या ५ मार्च २०१५ रोजी सादरकेलेल्या निवेदनाच्या उत्तर दाखल १३ मार्च २०२५ ला पत्र क्रमांक कु/जा.क्र.०९०/२०२५ अन्वये लेखी सांगितले की अतिक्रमणहटवूनच नळी बांधकाम करण्याचे काम सुरू असून रोड वरील अतिक्रमण धारकांना कसल्याही प्रकारचे झुकते माप देण्यात असलेलेनाही असे पत्रात नमूद केले होते. परंतु प्रत्यक्षात २२ मार्च २०२५ दिनांकला सुट्टीच्या दिवशी अभियंत्याची परवानगी न घेता सदरठिकाणी परत बांधकाम सुरू असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास असल्याने याबाबत मुख्याधिकाऱ्यांना मोबाईल द्वारे जाब विचारून लेखी सूचना केली होती. त्यातच नाली बांधकामात रस्त्याच्या बाजूस नलिकाठावरच लोखंडी एंगल टाकून नाली अतिक्रमण धारकांचे ताब्यात देण्याचे काम केले आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सदर नाली वरील बांधकाम मधे जोडलेले एंगल अंदाजपत्रकाप्रमाणे आहेत की कसे हे समजून घेणे करिता तक्रारकर्त्यांनी माहिती अधिकारात नगर पंचायत येथे अर्ज सादर करून माहिती मागितली असल्याचे समजते. या माहिती अधिकाराच्या पत्राला किती कालावधी लागेल हे पाहण्यासारखे आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!