कूलरमुळे विजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यू: दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ

कुरखेडा , १ एप्रिल : खरकाडा गावात आज एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली गेली. गावातील एका युवकाचाघरातील कूलरमुळे विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही घटना काल सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली असून, मृतकाचेनाव लहू मनोहर आत्राम वय २८ वर्ष असे आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक लहू आत्राम हा नागपूर येथील एका खाजगी कंपनीत कामावर होता व तो आजच रेशन कार्डची केवायसीकरण्याकरीता गावी खरकाडा येथे आला होता. आज नागपूर वरून घरी पोहचताच त्याने उकाळ्यामूळे त्याने कूलर सूरू करण्याचाप्रयत्न करताच त्याला विद्यूतचा जोरदार धक्का बसला.
लहू हा आपल्या घरात कूलरमध्ये पाणी भरत होता. कूलरमध्ये पाणी टाकत असताना अचानक त्याला विजेचा जोरदार धक्काबसला. कूलरच्या बॉडीला करंट आला असावा, अशी प्राथमिक शंका व्यक्त केली जात आहे. धक्का बसताच सचिन खालीकोसळला आणि त्याच्या कुटुंबीयांनी त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथे नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यालामृत घोषित केले. या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे.
कुटुंबीयांनी सांगितले की, कूलर गेल्या काही दिवसांपासून व्यवस्थित चालत होता आणि त्यात कोणतीही तांत्रिक बिघाडाची शंकानव्हती. मात्र, तरीही ही घटना कशी घडली, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन कूलरचीतपासणी सुरू केली आहे. प्राथमिक तपासात कूलरच्या वायरिंगमध्ये काही त्रुटी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.” तसेच, त्यांनीनागरिकांना घरगुती उपकरणे वापरताना सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
लहू हा त्याच्या कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य होता. त्याच्या पश्चात पत्नी, आई–वडील आणि एक लहान दीडवर्षाची मुलगी वमोठा आप्तपरीवार आहे. या घटनेमुळे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून, गावकऱ्यांनी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
लाहूच्या मृत्यूने खरकाडा गावात शोककळा पसरली असून, या घटनेतून धडा घेऊन भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठीउपाययोजना करणे गरजेचे आहे. सध्या पोलिसांचा तपास सुरू असून, शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे.