April 25, 2025

शिवाजी हायस्कूल कुरखेडा येथे सायबर गुन्हे जागरूकता कार्यक्रम संपन्न

कुरखेडा, 1 एप्रिल: ऑनलाईन अॅप आणि इंटरनेट सुविधांमुळे सायबर क्राईम चे प्रकार वाढत आहे . याची जाणीव आणि माहितीविद्यार्थ्यांना व्हाव्ही यासाठी शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा येथे सायबर गुन्हे जागरूकता कार्यक्रमाचेआयोजन करण्यात आले होते . पोलीस स्टेशन कुरखेडा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका आघाव यांनी विद्यार्थ्यांन सोबतसंवाद साधला .

सायबर क्राईम म्हणजे काय याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका आघाव यांनी विद्यार्थ्यांना दिली . त्या म्हणाल्yया आजकाल बऱ्याच विद्यार्थ्यांचे स्वत:चे फोन असतात किंवा पालकांचे फोन विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर वापरत असल्यामुळे या बाबत अशा प्रकारचे गुन्हे नकळत घडण्याचे शक्यता आहे . अपरिचित फोन , व्हिडीओ कॉल , अपरिचित नंबरवरून येणाऱ्याविनंत्या या बाबत विशेष जागरूक राहिले पाहिजे. मोबाईलच्या कॅमेऱ्यावर हात ठेवून बोलणे , आधी समोरच्याला बोलू देणे अशाप्रकारची काळजी घेणे आवश्यक आहे . त्याचप्रमाणे मोबाईल वर येणाऱ्या फेक न्यूजवर तत्काळ विश्वास ठेवता त्याची सत्यतापडताळून पहावी . सध्या फोटोमॉर्फिंग मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे त्याबाबतही विद्यार्थ्यांना जागरूक राहणे आवश्यक आहे .

या वेळी कोणत्याही अनोळखी व्यक्तीला कुठल्याही प्रकारची माहिती देऊ नये अथवा .टी.पी. सांगू नये या संदर्भात विद्यालयातीलविद्यार्थ्यांकडून सायबर जागृतीची प्रतिज्ञा घेण्यात आली . कार्यक्रमाचे संचालन आभारप्रदर्शन विद्यालयातील प्राध्यापक मनोज सराटे यांनी केले .

सदर सायबर गुन्हे जागरूकता कार्यक्रमास शिवाजी हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश गौरकार ,  कुरखेडापोलीस स्टेशनचे देवराव सहारे , किरण मडावी , सायबर पोलीस स्टेशन गडचिरोली येथील दिवाकर तनमनवार , महेश हिडामीविद्यालयातील जेष्ठ शिक्षक उद्धव वाघाडे , नरेंद्र कोहाडे , लिकेश कोडापे , नोगेश गेडाम , चंद्रकांत नरुले , प्रकाश मुंगनकार , राजेशपराते प्राध्यापक कालिदास सोरते , गुरुदास शेंडे , स्वप्नील खेवले , रुपेश भोयर , सोनिका वैद्य , भूमेश्वरी हलामी विद्यालयातीलजेष्ठ लिपिक अनिल बांबोळे , लोकेश राउत , कालिदास मलोडे , घनश्याम भोयर , शिवा भोयर , अक्षय देशमुख तथा विद्यालयातीलवर्ग ते ११ मधील विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!