April 26, 2025

पारस झोडे च्या “एंटी स्लीप अलार्म” संकल्पनेची इन्सपायर पुरस्कारासाठी निवड; मॉडेल तयार करण्यासाठी केंद्र शासनाकडून १० हजार रूपयाचे प्रोत्साहन

कुरखेडा,  २ एप्रिल : संस्कार पब्लिक स्कूल, कुरखेडा येथील विद्यार्थ्यांनी विज्ञान आणि नावीन्यपूर्ण संशोधन क्षेत्रात आपली छापपाडत राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठितइन्सपायर पुरस्कारसाठी आपले मॉडेल सादर करण्यासाठी निवड होण्याचा मान मिळवलाआहे. या यशामुळे शाळेची कीर्ती तर वाढलीच आहे, शिवाय संपूर्ण कुरखेडा परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

इन्सपायर” (Innovation in Science Pursuit for Inspired Research) हा पुरस्कार भारत सरकारच्या विज्ञान आणितंत्रज्ञान मंत्रालयातर्फे दिला जातो. हा पुरस्कार विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रदानकरण्यात येतो. यंदा या पुरस्कारासाठी देशभरातून हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यातून कुरखेडा येथील संस्कारपब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्याने आपल्या उत्कृष्ट प्रकल्पांद्वारे बाजी मारली.

शाळेतून या वर्षी विविध विद्यार्थ्यांनी ५ प्रस्ताव ऑनलाइन सादर केले होते. प्रकल्प संकल्पना सादरकर्तांना १५० शब्दात प्रकल्प बाबत मानवी जीवनावर सकारात्मक माहिती ही दिली होती. या सादर केलील्या पाच प्रस्ताव पैकी निवड झालेल्या विद्यार्थ्या मधे इयत्ता वीतील पारस नितीन झोडे यांचा समावेश आहे. पारसने “एंटी स्लीप अलार्महा प्रकल्प संकल्पना सादर केली होती. या प्रकल्पात वाहन चालवतांना चालकाला झोप येत असल्यास आलार्म वाजतो. या आलार्म मुळे चालक सतर्क होवून वाहन चालवेल व होणारे संभावित दुर्घटना थांबविता येईल.  रस्ता सुरक्षा व दुर्घटना विरहित परिवहन याविषयावर प्रकल्प संकल्पना सादर  केला. पारसला सदर प्रस्तावित संकल्पनेवर आधारित मॉडेल तयार करण्या करीत १० हजार रुपये प्रोत्साहन म्हणून केंद्र शासनाकडून मिळाले आहे.

शाळेचे मुख्याध्यापक श्री. देवेंद्र फाये यांनी सांगितले की, “आमच्या विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक यशच नव्हे, तर सामाजिकसमस्यांवर उपाय शोधण्याची क्षमता दाखवली आहे. त्यांच्या या कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे.” शाळेतील विज्ञान शिक्षककु. कोमल निरंकारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मोलाचे योगदान दिले.

या यशाबद्दल बोलताना पारसने आपल्या भावना व्यक्त केल्या, “हा पुरस्कारसाठी प्रकल्प तयार करण्यासाठी झालेली माझी निवड प्रेरणादायी आहे. मी भविष्यातही विज्ञान क्षेत्रात काम करून समाजासाठी काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न करेन. आपल्या यशाचेश्रेय शिक्षक आणि पालकांना दिले.

इन्सपायर पुरस्कारांतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनात सहभागी होण्याची संधी मिळेल. तिथे त्यांनाआपले प्रकल्प देशभरातील तज्ज्ञांसमोर सादर करता येतील. याशिवाय त्यांना शिष्यवृत्ती आणि संशोधनासाठी आर्थिक मदतहीमिळणार आहे.

या यशामुळे कुरखेडा येथील संस्कार पब्लिक स्कूलने ग्रामीण भागातील शिक्षणाची पातळी उंचावण्याचे उदाहरण घालून दिले आहे. पारस झोडे यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळा समिती अध्यक्ष तथा कोषाध्यक्ष वामनराव फाये , संस्था सचिव दोषहरराव फाये, संस्थासहसचिव प्राचार्य ,नागेश्वर फाये, प्राचार्य, देवेंद्र फाये, शिक्षक हर्षा दरवडे, पिंटू रामटेके आई वडील गुरुजन संस्थाचालक  यांना दिले आहे. स्थानिक नागरिक आणि पालकांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्याआहेत.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!