April 25, 2025

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात गडचिरोली जिल्हा अग्रेसर; जिल्ह्यात ४८५ नवउद्योजकांना कर्ज मंजुरी, १०० टक्के उद्दिष्टपूर्ती

गडचिरोली, दि. : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी करत१०० टक्के उद्दिष्टपूर्ती साधली आहे. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली या योजनेचीयशस्वी अंमलबजावणी झाली असून, जिल्ह्यातील ४८५ नवउद्योजकांचे कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत.

जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नवउद्योजकांना वित्तपुरवठा करण्यातआला असून, त्यांना अनुदान (सबसिडी) देखील मिळवून देण्यात जिल्हा अग्रेसर ठरला आहे. विविध बँकांनी या योजनेसाठी सक्रियसहभाग नोंदवला असून, बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रत्येकी १२९ प्रकरणे, बँक ऑफ इंडियाने ८६, विदर्भकोकण ग्रामीण बँकेने ६४ आणि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँकेने ५२ प्रकरणांना मंजुरी दिली आहे.

जिल्हाधिकारी पंडा यांनी नियमितपणे बैठका घेऊन योजनेची प्रगती तपासली. बँकांनी देखील त्यांना दिलेल्या उद्दिष्टांचे वेळेत पालनकरत सहकार्य केले. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँकांचे अभिनंदन करत, आगामी काळातही अशाच प्रकारचे सहकार्य अपेक्षितअसल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमासह केंद्र शासनाच्या पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमासाठीही जिल्ह्यातील बँकांचासकारात्मक दृष्टिकोन असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही योजना राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकयुवतींसाठी उद्योगउभारणीसाठी अनुदान आर्थिक सहाय्य पुरवते. त्यामुळे या योजनांचा लाभ अधिकाधिक बेरोजगारांनी घ्यावा, असे आवाहन श्री. गायकवाड यांनी केले.

गडचिरोली जिल्ह्यात स्थानिक बाहेरील उद्योजकांसाठी गुंतवणुकीस पोषक वातावरण निर्माण झाले असून, बँकांकडून उद्योगांसाठीआवश्यक असलेली पतनिर्मिती तत्परतेने करण्यात येत असल्याचे अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. प्रशांत धोंगडे यांनी सांगितले.

या यशस्वी अंमलबजावणीसाठी अग्रणी बँक व्यवस्थापक, सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक, शाखा व्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्राचेअधिकारीकर्मचारी, खादी ग्रामोद्योग मंडळाचे अधिकारी श्री. मेश्राम कर्मचारी, जिल्हा परिषदेची उमेद (MSRLM), माविम, तसेच मिटकॉन आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) या प्रशिक्षण संस्थांनी मोलाची भूमिका बजावली.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!