वॉइस ऑफ मीडिया भामरागड तालुका कार्यकारिणी गठीत: लीलाधर कसारे यांची अध्यक्षपदी निवड

भामरागड, दि. ११ एप्रिल : – वॉइस ऑफ मीडियाच्या भामरागड तालुका कार्यकारिणीची स्थापना नुकतीच जिल्हा अध्यक्ष व्यंकटेशदुडुमवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत करण्यात आली. या सभेत तालुकास्तरीय कार्यकारिणीच्या विविध पदांवरनवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून, यामुळे संघटनेच्या कार्याला नवीन दिशा आणि गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
व्हॉईस ऑफ मिडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, प्रदेश कार्याध्यक्ष मंगेश खाटीक, विदर्भ अध्यक्ष किशोर कारंजेकर यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष व्यंकटेश दुडमवार यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील १२ हि तालुक्याची नव्याने कार्यकारिणी बनविण्याचे काम सुरू आहे.
सभेत सर्वानुमते लीलाधर कसारे यांची तालुका अध्यक्षपदी निवड झाली. या सोबतच गोविंद चक्रवर्ती यांना सचिव, मनीष येमुलवार यांना उपाध्यक्ष, रमेश मार्गोनवार यांना कोषाध्यक्ष, आबिद शेख यांना कार्याध्यक्ष, प्रदीप कर्मकार यांना संघटक, आणि कविश्वर मोतकुलवार तसेच रोहित बोलमपल्लीवर यांना प्रसिद्धी प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली. याशिवाय, राजेंद्र कोठारे यांची सहसचिव, तर अविनाश नारनवरे, महेंद्र कोठारे, आणि शामराव येलकरवार यांची जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड झाली.
या सभेला वॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा सचिव विलास ढोरे, जिल्हा कार्याध्यक्ष नसिर हाशमी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थितहोते. निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रदेश उपाध्यक्ष मंगेश खाटीक यांनी दूरध्वनीद्वारे उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केले. त्यांनीवॉइस ऑफ मीडियाच्या वाढत्या लोकप्रियतेचा उल्लेख करताना, “संघटना भविष्यात नोबेल पुरस्कार मिळवण्यापर्यंत प्रगती करेल,” असा महत्त्वाकांक्षी संकल्प व्यक्त केला.
मंगेश खाटीक यांनी पुढे सांगितले की, वॉइस ऑफ मीडिया ही संघटना पत्रकारांच्या कल्याणासाठी पंचसूत्रीवर काम करते. यात पत्रकारांचे आरोग्य, शिक्षण, निवास, कौशल्य विकास आणि निवृत्तिवेतन यांचा समावेश आहे. तसेच, दरवर्षी पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक किट वितरित करण्याचे कार्य संघटना करते. “या किट गरजू पत्रकारांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम आपण सर्वांनी मिळून करायचे आहे,” असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी नवनिर्वाचित तालुका कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करतत्यांना शुभेच्छा दिल्या.
नवनिर्वाचित अध्यक्ष लीलाधर कसारे यांनी आपल्या मनोगतात सांगितले, “वॉइस ऑफ मीडिया ही पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि समाजातील उपेक्षितांच्या आवाजाला बळ देण्यासाठी कार्यरत आहे. भामरागड तालुक्यातील पत्रकारांना एकत्र आणून स्थानिक समस्यांवर लक्ष केंद्रित करू आणि सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करू.”
सभेत उपस्थित पत्रकारांनी तालुक्यातील विकास, शिक्षण, आरोग्य, आणि पायाभूत सुविधांशी संबंधित समस्यांवर चर्चा केली. या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना सुचवण्यासाठी कार्यकारिणीने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केलीगेली. यावेळी सर्वांनी नवीन कार्यकारिणीला पाठिंबा दर्शवत एकजुटीने काम करण्याचा संकल्प केला.
वॉइस ऑफ मीडिया ही संस्था गडचिरोली जिल्ह्यात पत्रकारांच्या हितासाठी आणि सामाजिक जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यरत आहे. भामरागड तालुक्यात नव्याने स्थापन झालेल्या कार्यकारिणी मुळे या कार्याला अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
सभेचे संचालन विलास ढोरे यांनी केले, तर आभारप्रदर्शन नसिर हाशमी यांनी केले. सभा यशस्वी होण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी सहकार्य केले.