April 25, 2025

गेवर्धा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात साजरी: बुद्धविहारात ध्वजारोहण, बुद्धवंदना व प्रेरणादायी मार्गदर्शन

ताहिर शेख , (प्रतिनिधी), कुरखेडा/गेवर्धा: १४ एप्रिल : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, सामाजिक समतेचे प्रणेते आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त पंचशील बौद्ध समाज संघटना, गेवर्धा यांच्या वतीने गेवर्धा बुद्ध विहार येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ध्वजारोहण, बुद्धवंदना आणि मार्गदर्शनपर सत्रांनी सजलेल्या या कार्यक्रमाने गावकऱ्यांमध्ये उत्साह आणि प्रेरणेचा संचार केला.

सकाळी बुद्धविहार परिसरात उपस्थित मान्यवर आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. हरिदासजी नंदेश्वर यांच्या हस्ते ध्वजाचे आरोहण संपन्न झाले. ध्वजाला मानवंदना देताना उपस्थितांनी बाबासाहेबांच्या कार्याला उजाळा दिला. त्यानंतर बुद्धवंदनेने कार्यक्रमाला पावित्र्य प्राप्त झाले.

मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे अध्यक्षपद राजलक्ष्मी कंपनीचे व्यवस्थापक श्री. राजेश तिनखेडे यांनी भूषवले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सरपंच सुषमा मडावी, वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश बोरकर, ग्रामपंचायत सदस्य रोशन सय्यद, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष राजु बारई, कृषी उद्योग बचत गटाचे उपसभापती व्यंकटी नागिलवार, ग्रामपंचायत सदस्य हेमंत शिडाम, ग्रामसभा अध्यक्ष सुरेश पुसाम, ग्रामसभा सचिव सुधीर बुद्धे, ग्रामकोष अध्यक्ष राजेंद्र कुमरे, जावेद शेख, निजामुद्दीन शेख, नेवारे महाराज, अरुण डोंगरवार, कैलास कुथे, नितीन कुथे, मडावी सर, मसराम सर, मधुकर शेंडे, कृष्णा मस्के, यादव नाकतोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्या शिक्षण, समता आणि बंधुत्वाच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. बाबा साहेबांनी समाजातील उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेले योगदान आणि भारतीय राज्य घटनेतील त्यांचे कालातीत मूल्य यावर मार्गदर्शन झाले. उपस्थितांनी बाबासाहेबांचेशिका, संघटित व्हा, संघर्ष कराहेब्रीदवाक्य प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचा संकल्प व्यक्त केला.

बुद्धविहार परिसरात आयोजित या कार्यक्रमाला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बुद्धवंदने नंतर सामूहिक चर्चा आणि विचार मंथनाने उपस्थितांना बाबासाहेबांच्या तत्त्वज्ञानाची नव्याने ओळख झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंचशील बौद्ध समाजसंघटनेने केलेल्या नियोजनाचे सर्वांनी कौतुक केले.

या जयंतीनिमित्त गेवर्धा गावात सामाजिक एकतेचा संदेश प्रसारित झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन गावकऱ्यांनी समतेच्या दिशेने वाटचाल करण्याचा निर्धार व्यक्त केला. हा कार्यक्रम केवळ जयंती साजरी करण्यापुरता मर्यादित राहता, बाबासाहेबांच्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रेरणादायी ठरला.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!