नवेगावात हनुमान मंदिराचा कायाकल्प: बबलू भैय्या हकीम यांच्या दानशूर हातांनी ३५ वर्षांनंतर साकारले भक्तीचे भव्य मंदिर

अहेरी, १५ एप्रिल २०२५: अहेरी तालुक्यातील नवेगाव (वे) गावात हनुमान जयंतीच्या (१२ एप्रिल २०२५) शुभ मुहूर्तावर ३५ वर्षे जुन्या, जीर्ण झालेल्या हनुमान मंदिराच्या नव्या भव्य इमारतीचे लोकार्पण सामाजिक कार्यकर्ते आणि गावाचे सुपुत्र बबलू भैय्या हकीमयांच्या हस्ते उत्साहात झाले. शाहीन भाभी हकीम आणि छोटू भैया हकीम यांच्या विशेष उपस्थितीने हा सोहळा भक्तिमय झाला. गावकऱ्यांच्या एकजुटीने आणि बबलू भैय्या यांच्या उदार आर्थिक मदतीने हे मंदिर नव्याने उभे राहिले, जणू गावाच्या श्रद्धेला नवा साजचढला.
या भव्य समारंभाला गावातील ज्येष्ठ नागरिक तुकाराम झोडे, वासुदेव गाऊत्रे, राऊजी शेंडे, शिवराम मोहुर्ले, मुख्याध्यापक गजाननलोणबले, प्राचार्य विठ्ठल निखुले यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. उपसरपंच उमेशजी मोहुर्ले यांनी प्रास्ताविकातमंदिराच्या इतिहासाचा मागोवा घेत बबलू भैय्या यांच्या योगदानाला सलाम ठोकला. “ज्याप्रमाणे प्रभू श्रीराम, सीता माता आणिलक्ष्मण गावात आले, तसेच बबलू भैय्या, शाहीन भाभी आणि छोटू भैया आज आमच्या गावात अवतरले,” असे त्यांनी भावपूर्ण उद्गारकाढले.
गावकऱ्यांनी बबलू भैय्या, शाहीन भाभी आणि छोटू भैया यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. मंदिराच्याबांधकामात योगदान देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना, गाव पाटलांना आणि कारागिरांना साडीचोळी, शाल व श्रीफळ देऊन गौरवण्यातआले. बबलू भैय्या यांनी आपल्या ओजस्वी भाषणात मंदिराला आस्थेचे आणि एकतेचे प्रतीक संबोधले. “गावचा मुलगा म्हणून मी हीमदत केली. यापुढेही ईश्वरीय कार्यासाठी मी सदैव तत्पर आहे. गावातील तरुणांनी शिक्षण घेऊन माळी समाजाचे नाव जगातउंचावावे,” असे आवाहन त्यांनी केले. छोटू भैया यांनी सर्व धर्मांचा आदर व्यक्त करत गावाच्या एकजुटीची ताकद अधोरेखित केली. “एकत्र आलो की कोणतीही अडचण मोठी राहत नाही,” असे त्यांनी ठासून सांगितले.
मंदिर बांधकाम समितीचे गजानन मोहुर्ले, विश्वनाथ गुरनुले, उमेश मोहुर्ले, यादव झोडे, शरद गाऊत्रे यांच्यासह सर्व सदस्यांनीरात्रंदिवस मेहनत घेतली. सूत्रसंचलन संजय गुरनुले यांनी तर आभारप्रदर्शन रेघे सर यांनी केले. नवेगाव आणि परिसरातील महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा सोहळा अविस्मरणीय बनवला. नवेगावने या मंदिराच्या पुनर्जननातूनआपले सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभव पुन्हा एकदा सिद्ध केले.