कोचीनारा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त बुद्ध विहाराच्या बांधकामाचे भव्य भूमिपूजन

कोरची, १७ एप्रिल : कोरची तालुक्यातील कोचीनारा येथे बौद्ध समाजा तर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंती निमित्त धम्मभूमी येथे नवीन बुद्ध विहाराच्या बांधकामाचे भव्य भूमिपूजन रविवारी सकाळी माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रकल्पासाठी गजबे यांनी पुढाकार घेऊन निधी उपलब्ध करून दिला, ज्यामुळे बौद्ध समाजात उत्साहाचे वातावरण आहे.
भूमिपूजन सोहळ्यानंतर समाज प्रबोधन, सांस्कृतिक आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सह-उद्घाटक कोरची तालुका भाजपा अध्यक्ष नसरुद्दीन भामानी आणि अध्यक्ष सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक अशोक कराडे होते. विशेष अतिथीं मध्ये भाजप नेते आनंद चौबे, बँक ऑफ इंडिया शाखा व्यवस्थापक मनोज नंदेश्वर, हिवराज कराडे, कांताराम जमकातन, राहुल अंबादे, स्वप्नील कराडे, टेंमलाल देवांगण, तालुका मुक्तिपथ निळा किलनाके, सुदाराम सहारे, सरपंच रुपराम देवांगण, दयाळू बढईबन्स आणि वैजंतीमाला कराडे यांची उपस्थिती होती.
प्रमुख मार्गदर्शक सेवानिवृत्त प्राचार्य देवराव गजभिये यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील संघर्ष आणि सामाजिक योगदानावर सविस्तर मार्गदर्शन केले. उपस्थित मान्यवरांनीही आपले विचार मांडले. सायंकाळी सहभोजनानंतर उदयपाल महाराज यांच्या खंजिरीच्या माध्यमातून प्रबोधनात्मक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बौद्ध समाजाचे सचिव नितेश कराडे यांनी केले, तर आभार वामन नंदेश्वर यांनी मानले. या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी बौद्ध समाजाचे अध्यक्ष किशोर कराडे, उपाध्यक्ष निर्मला कराडे, सहसचिव महानंदा कराडे, संयोजक प्रशांत कराडे आणि समस्त बौद्ध बांधवांनी अथक परिश्रम घेतले. हा सोहळा कोचीनारा गावातील बौद्ध समाजासाठी एक ऐतिहासिक क्षण ठरला, ज्याने सामाजिक एकता आणि प्रबोधनाचा संदेश दिला.