April 25, 2025

ठाकूरनगरमध्ये भीषण अपघात! दुचाकी जळून खाक, दोन भावांसह तिघांचा मृत्यू

चामोर्शी, १७ एप्रिल : चामोर्शी तालुक्यातील घोटसुभाषग्राम मार्गा वरील ठाकूरनगर पहाडी जवळ गुरुवार सकाळी :३० ते १०:०० वाजता घडलेल्या भीषण अपघाताने परिसर हादरला. भरधाव दुचाकी अनियंत्रित होऊन सागवान झाडाला धडकल्याने दुचाकी जळून खाक झाली, तर त्या वरील तिघा युवकांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन सख्खे भाऊ असल्याने कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

मृतांची नावे अशी: साहेब सुभाशिष चक्रवर्ती (१६, वसंतपुर), सौरभ सुभाशिष चक्रवर्ती (२०, वसंतपुर) आणि विशाल भुपाल बच्छाड(१९, शिरपूर, तेलंगणा). विशाल दुचाकी चालवत होता. वसंतपुरहून घोटकडे जाताना ठाकूरनगरच्या तीव्र वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि झाडाला धडक बसली. जोरदार धडकेत तिघांचा मृत्यू झाला, तर दुचाकीने पेट घेतला आणि ती पूर्ण जळाली.

घटनेनंतर घोट पोलिस मदत केंद्राचे पोलिस निरीक्षक नितेश गोहणे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळ गाठले. मृतदेह शवविच्छेदनासाठी चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. अपघातामुळे वाहतूक खोळंबली, परंतु पोलिसांनी परिस्थिती नियंत्रित केली. घोट पोलिस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार नितेश गोहणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. अतिवेग आणि वळणाचा अंदाज आल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

या घटनेने वसंतपुरात शोककळा पसरली. चक्रवर्ती कुटुंबीयांचा आक्रोश हृदयद्रावक आहे. स्थानिकांनी रस्त्यावरील सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करत गतिरोधक आणि सूचना फलकांची मागणी केली. पोलिसांनी नागरिकांना वाहन चालवताना काळजी घेण्याचे आवाहन केले. हा अपघात रस्ता सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित करतो. मृतांच्या आत्म्याला शांती लाभो, अशी प्रार्थना परिसरात होत आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!