चांगदेव फाये यांची कुरखेडा भाजपा तालुका अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती: नव्या उत्साहाने पक्षाला बळ

कुरखेडा, २१ एप्रिल : भारतीय जनता पक्षाच्या कुरखेडा तालुका अध्यक्षपदी चांगदेव फाये यांची पुन्हा एकदा निवड झाली आहे. सोमवारी कुरखेडा येथील भाजपा कार्यालयात झालेल्या उत्साहपूर्ण वातावरणात ही घोषणा करण्यात आली. भाजपा जिल्हामहामंत्री गोविंदजी सारडा, सदानंद कुथे आणि जिल्हा उपाध्यक्ष राजेश जेठानी यांच्या प्रमुख उपस्थितीत फटाके फोडून, मिठाईवाटप करून आणि पुष्पगुच्छ देऊन फाये यांचा सत्कार करण्यात आला.
वकृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व यांच्या जोरावर फाये यांनी पक्ष संघटनेत मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या या निवडीमुळेकुरखेडा तालुका भाजपाला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. गोविंदजी सारडा यांनी निवडणूकप्रक्रियेची माहिती देताना भाजपाला जगातील क्रमांक एकचा पक्ष ठरवत, कार्यकर्त्यांमध्ये अभिमानाची भावना जागवली.
या कार्यक्रमाला भाजपाचे ज्येष्ठ नेते सोमनाथ पाटील डोंगरवार, जिल्हा उपाध्यक्ष गणपत सोनकुसरे, अल्पसंख्यक मोर्चा जिल्हाअध्यक्ष बबलू हुसेनी, ओबीसी जिल्हा महामंत्री रवींद्र गोटेफोडे, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष ॲड. उमेश वालदे, तसेच महिलामोर्चाच्या शहर अध्यक्ष कल्पना मांडवे, तालुका महामंत्री जयश्री मडावी, जिल्हा सदस्या रूपाली कावळे यांच्यासह अनेकपदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. फाये यांच्या नेतृत्वाखाली कुरखेडा तालुकाभाजपा अधिक मजबूत होईल, अशी आशा सर्वांनी व्यक्त केली.