‘आप’ली सुराज्य मोहीम’ आज गडचिरोलीत : नागरिकांच्या प्रश्नांसाठी AAP चा संवाद, पत्रकार परिषद

गडचिरोली, १ मे : महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून आम आदमी पार्टी (AAP) महाराष्ट्राने *‘आप’ली सुराज्य मोहीम’* ची शानदार सुरुवात चंद्रपूर येथून केली असून, आज १ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता ही मोहीम गडचिरोली जिल्ह्यातील इंदिरा गांधी चौकात दाखल होणार आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांत ४,५०० किलोमीटरचा प्रवास करत नागरिकांच्या ज्वलंत प्रश्नांवर संवाद साधणारी ही मोहीम शेतकरी, कामगार आणि सामान्य जनतेच्या हक्कांसाठी लढण्याचा निर्धार घेऊन पुढे सरकत आहे. याप्रसंगी पत्रकार परिषद आणि नागरिकांशी संवाद सत्र आयोजित करण्यात आले आहे.
मोहिमेच्या नेतृत्वाखाली AAP चे कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील, राज्य संघटक ऍड. मनीष मोडक, राज्य संघटन सचिव भूषण ढाकुलकर, राज्य सचिव डॉ. अभिजीत मोरे, सोनू फटिंग, डॉ. शाहिद अली जाफरी, राज्य सहसचिव सागर पाटील आणि सोशल मीडिया प्रमुख डॉ. नामदेव भागीले पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ पदाधिकारी सहभागी झाले आहेत. गडचिरोलीतील स्थानिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी ही मोहीम कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना एकत्र आणेल.
‘आप’ली सुराज्य मोहीम’ शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणापासून ते गडचिरोलीतील आदिवासींच्या हक्कांपर्यंत, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि भ्रष्टाचारविरोधी लढ्यावर लक्ष केंद्रित करेल. इंदिरा गांधी चौकात होणाऱ्या पत्रकार परिषदेत AAP नेते स्थानिक ज्वलंत प्रश्नांवर पक्षाची भूमिका मांडतील आणि नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देतील. याशिवाय, सामाजिक संघटना, पत्रकार आणि नागरिकांशी संवाद साधून गडचिरोलीच्या सामाजिक-राजकीय समस्यांवर चर्चा होईल.
“गडचिरोलीतील नागरिकांच्या हक्कांसाठी आणि स्थानिक प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ही मोहीम सरकारला जाब विचारण्याचा आणि जनतेचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न आहे,” असे ऍड. मनीष मोडक यांनी सांगितले. जिल्हा संयोजक नसिर हाशमी यांनी नागरिकांना या संवाद सत्रात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. “हा संवाद गडचिरोलीच्या प्रत्येक नागरिकाला आपले प्रश्न मांडण्याची संधी देईल,” असे त्यांनी नमूद केले.
*संपर्क*: ऍड. मनीष मोडक (9822611100), नामदेव भागीले पाटील (9764012206)
*हॅशटॅग्स*: #आपली_सुराज्य_मोहीम #AAPMaharashtra #चलासत्यबोलूया
🔥 *‘आप’ली सुराज्य मोहीम’ – गडचिरोलीपासून महाराष्ट्राच्या नव्या परिवर्तनाची सुरुवात! 🔥