सुनील नंदनवार यांची आरमोरी विधानसभा सह-अध्यक्षपदी निवड; राष्ट्रवादी काँग्रेसला नवे बळ
आरमोरी, २३ मे: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गदचिरोली जिल्हा अध्यक्ष रविंद्र वासेकर यांनी आरमोरी येथील सक्रिय कार्यकर्ते सुनील नंदनवार यांची आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या सह-अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती पक्षाच्या कार्याला नवीन गती देणारी ठरणार असून, नंदनवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा आहे.
सुनील नंदनवार यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय माजी मंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम, माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी, प्रदेश उपाध्यक्ष नाना नाकाडे, प्रदेश सरचिटणीस युनूस शेख आणि जिल्हा उपाध्यक्ष दिलीप मोटवानी यांना दिले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे पक्षाच्या स्थानिक पातळीवरील कार्याला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या नियुक्तीचे स्वागत करताना पक्षाचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष किशोर तलमले, तालुका अध्यक्ष अमीन लालानी, शहर अध्यक्ष प्रदीप हजारे, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश पोटुवार, देसाईगंज तालुका अध्यक्ष संजय साळवे, कुरखेडा तालुका अध्यक्ष राम लांजेवार, कोरची तालुका अध्यक्ष प्रतापसिंग गजभिये, महिला जिल्हा कार्याध्यक्षा रुषाली भोयर, सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष अक्षय बोरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नंदनवार यांचे अभिनंदन केले आहे. यामध्ये महिला तालुका अध्यक्ष संगीता मेश्राम, महिला शहर अध्यक्ष जयश्री भोयर, हरिराम मातेरे, राकेश बेहरे, प्रशांत मोगरे, आकाश मडावी, शाम सपाटे, सुनील बांगरे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
“नंदनवार यांच्या नियुक्तीमुळे आरमोरी विधानसभा क्षेत्रात पक्षाच्या कार्याला नवी दिशा मिळेल, अशी आशा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. पुढील वाटचालीसाठी त्यांना सर्व स्तरांतून शुभेच्छा देण्यात येत आहेत.”
