जिल्हास्तरीय युवा पुरस्कार 2024-25: गडचिरोलीतून समाजहितासाठी कार्य करणाऱ्यांना संधी

गडचिरोली,  23 मे : समाजासाठी सकारात्मक बदल घडवणाऱ्या युवक, युवती आणि संस्थांना गौरविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे ‘जिल्हा युवा पुरस्कार 2024-25’ साठी अर्ज मागविण्यात येत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील 13 ते 35 वयोगटातील युवक-युवती आणि किमान 5 वर्षे कार्यरत नोंदणीकृत संस्थांना या पुरस्कारासाठी अर्ज करण्याची संधी आहे.

पुरस्काराची वैशिष्ट्ये:
– दरवर्षी एक युवक, एक युवती आणि एका संस्थेला हा पुरस्कार प्रदान केला जातो.
– 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2024 या कालावधीतील समाजोपयोगी कार्य विचारात घेतले जाईल.
– आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, क्रीडा, विज्ञान, रोजगार, व्यसनमुक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेसह स्थानिक समस्या सोडवणारी कामे मूल्यांकनासाठी पात्र.

पात्रतेचे निकष:
युवक/युवतींसाठी:
– वय 1 एप्रिल 2024 रोजी 13 ते 31 मार्च 2025 रोजी 35 वर्षांपर्यंत.
– गडचिरोली जिल्ह्यात सलग 5 वर्षांचा वास्तव्याचा दाखला.
– पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र आणि स्वयंस्फूर्त कार्य आवश्यक.
– सरकारी/निमशासकीय कर्मचारी अपात्र.
– पुरस्कारानंतर 2 वर्षे कार्यरत राहण्याचे हमीपत्र.
संस्थांसाठी:
– सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1860 किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट अ‍ॅक्ट 1950 अंतर्गत नोंदणी.
– किमान 5 वर्षे कार्यरत.
– सर्व सदस्यांचे पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र आवश्यक.

इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रे आणि हमीपत्रांसह दोन प्रतीत अर्ज बंद लिफाफ्यात 1 जुलै 2025 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा क्रीडा संकुल, गडचिरोली येथे सादर करावेत. कार्यालयीन वेळेत संपर्क साधून सविस्तर माहिती मिळवावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी केले आहे.

“समाजहितासाठी कार्य करणाऱ्या युवक, युवती आणि संस्थांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या कार्याचा गौरव मिळवावा, असे क्रीडा विभागाने कळविले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा.”

About The Author

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!