कोरचीत धम्म संस्कारांचा संदेश: बाल शिबिराचा उत्साहपूर्ण शुभारंभ

कोरची, ५ जून : शाळेतील मुलांमध्ये धम्म संस्कार रुजवण्याच्या उद्देशाने दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, तालुका शाखा कोरचीच्या पुढाकाराने निर्मल हॉटेल, कोरची येथे दिनांक ४ ते ६ जून २०२५ या कालावधीत आयोजित तीन दिवसीय बाल धम्म संस्कार शिबिराचे उद्घाटन यशस्वीपणे संपन्न झाले.

या शिबिराचे उद्घाटन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, तालुका शाखा कोरचीचे प्रवक्ते डॉ. विनोद चहारे यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा संस्कार प्रमुख काका गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विभागीय अध्यक्ष आनंदराव मेश्राम, महेश लाडे, कमलेश भानारकर, सचिव चंद्रशेखर वालदे, कोषाध्यक्ष रमेश शहारे, प्रा. किशोर वालदे, तालुका संस्कार प्रमुख ज्योतीताई भैसारे, चंद्रशेखर अंबादे, चेतन कराडे, कांता अंबादे, संध्या मेश्राम, सुखदेव मेश्राम, चुकंदर लाउत्रे, अरुण सहारे, बालक साखरे, मदन उंदीरवाडे, ईश्वर साखरे, सूर्यकांत भैसारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शिबिरादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून मुलांमध्ये बौद्ध धम्माची तत्त्वे आणि नैतिक मूल्ये रुजवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शिबिराच्या पहिल्या दिवशी ४० मुलांनी उत्साहाने सहभाग नोंदवला, ज्यामुळे कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाचे संचालन चंद्रशेखर आंबादे यांनी केले, प्रस्ताविक आनंदराव मेश्राम यांनी मांडले, तर आभार प्रदर्शन रमेश शहारे यांनी केले. हे शिबिर मुलांमध्ये सामाजिक जागरूकता, नैतिकता आणि धम्माचे मूल्य रुजवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

About The Author

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!