September 6, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

विद्यार्थ्यांनो, वेळेत अर्ज करा! महाडिबीटी शिष्यवृत्ती योजना सुरू

“महाडिबीटी शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया सुरू: गडचिरोलीतील विद्यार्थ्यांसाठी ३० जूनपासून ऑनलाइन अर्जाची संधी”

गडचिरोली, ९ जुलै : शैक्षणिक सत्र २०२५-२६ साठी अनुसूचित जाती, इतर मागासवर्ग (इमाव), विकासनशील मागासवर्गीय प्रवर्ग (विमाप्र), आणि विशेष मागास प्रवर्ग (विजाभज) यांतील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कासाठी महाडिबीटी ऑनलाइन पोर्टलवर अर्ज प्रक्रिया ३० जून २०२५ पासून सुरू झाली आहे. समाजकल्याण विभागाने पात्र विद्यार्थ्यांना नवीन (फ्रेश) आणि नूतनीकरण (रिन्युअल) अर्ज त्वरित सादर करण्याचे आवाहन केले आहे.

भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार समाजकल्याण आणि बहुजन कल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या या योजनेअंतर्गत मागील शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांनाही अर्ज करण्याची संधी आहे. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांनी https://mahadbtmahait.gov.in/Home/Index या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि अटी-शर्तींची माहिती घ्यावी. शासनाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असून, वेळेत अर्ज सादर करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी केले आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!