September 6, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

“कुरखेड्यात लाचखोर अधिकाऱ्यावर कारवाई: ७० हजारांसह रंगेहाथ अटक”

गडचिरोली, ७ ऑगस्ट : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कुरखेडा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहायक रवींद्र सदाशिव दिनकोंडावार (वय ४२) याला ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. शेतजमिनीच्या पोटहिस्स्याची मोजणी, सातबारा वेगळा करणे आणि चालान काढण्यासाठी त्याने सुरुवातीला १ लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती तो ७० हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाला.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने आपल्या शेतजमिनीच्या कामासाठी कुरखेडा येथील भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. मात्र, दिनकोंडावार याने लाच मागितल्याने तक्रारदाराने गडचिरोली येथील ACB कडे तक्रार नोंदवली. ५ ऑगस्ट रोजी पडताळणी केल्यानंतर, ६ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ACB ने सापळा रचून दिनकोंडावार याला पंचांसमक्ष अटक केली. त्याच्यावर कुरखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक सागर कवडे, अपर पोलिस अधीक्षक सचिन कदम आणि पोलिस उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांच्या नेतृत्वात झाली. सहायक फौजदार सुनील पेद्दीवार, हवालदार राजेश पद्मगिरवार, किशोर जौंजारकर, स्वप्नील बांबोळे, संदीप उडाण, संदीप घोरमोडे, प्रवीण जुमनाके, हितेश जेट्टीवार, विद्या म्हशाखेत्री, ज्योत्स्ना वसाके, राजेश्वर कुमरे आणि चापले यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!