March 7, 2026

कोरचीत भाजपची तालुका कार्यकारिणी बैठक; पक्ष बळकटीसाठी गजबे यांचा मंत्र

“कोरचीत भाजप तालुका विस्तारित कार्यकारिणी बैठक यशस्वी; माजी आमदार कृष्णा गजबे यांचे कार्यकर्त्यांना एकजुटीचे आवाहन”

कोरची, ११ ऑगस्ट : रविवारी, १० ऑगस्ट २०२५ रोजी कोरची येथील मोरेश्वर महाविद्यालयात भारतीय जनता पक्षाची (भाजप) तालुका विस्तारित कार्यकारिणी बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार कृष्णा गजबे यांची प्रमुख उपस्थिती होती.

माजी आमदार गजबे यांच्या हस्ते नवनियुक्त तालुका कार्यकारी पदाधिकारी आणि सदस्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या जिल्हा कार्यकारिणीतील अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष प्रा. देवराव गजभiye यांचा शाल आणि नारळ देऊन सत्कार केला.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात कृष्णा गजबे यांनी कार्यकर्त्यांना पक्षाला बळकट करण्यासाठी एकजुटीने आणि समर्पित भावनेने काम करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “येणाऱ्या काळात पक्षाच्या ध्येयधोरणांना गावागावात पोहोचवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय सहभाग नोंदवावा.”

बैठकीला भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य नसरुद्दीन भामानी, डॉ. शैलेंद्रकुमार बिसेन, तालुकाध्यक्ष सदाराम नुरुटी, जिल्हा सचिव आनंद चौबे, कमलनारायण खंडेलवाल, तालुका महामंत्री घनशाम अग्रवाल, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विनोद कोरेटि, शहर अध्यक्ष स्वप्नील कराडे, उपाध्यक्ष प्रेमलाल उसेंडी, युवा मोर्चा महामंत्री प्रशांत कराडे, उपाध्यक्ष अविनाश हारामी, महिला मोर्चा अध्यक्षा सीलाताई सोनकुतरी, आदिवासी आघाडी अध्यक्ष सुरेश काटेंगे, उपाध्यक्ष मुकेश नरोटे, ओबीसी आघाडी अध्यक्ष टेमलाल देवांगण तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकर नखाते, नंदकिशोर वैरागडे, महादेव बनसोड आणि अशोक गावतुरे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विनोद कोरेटि यांनी केली, तर आदिवासी आघाडी अध्यक्ष सुरेश काटेंगे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. ही बैठक पक्षाच्या स्थानिक पातळीवरील कार्याला नवी दिशा देणारी ठरली.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!