September 6, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

गडचिरोलीत ‘हर घर तिरंगा’ अभियानात तिरंगा सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

गडचिरोली, 12 ऑगस्ट : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने केंद्र शासनाच्या “हर घर तिरंगा” जनचळवळीला गडचिरोली शहरातून यंदाही उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला. देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी आणि भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल जनजागृती करण्यासाठी 2 ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीत राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवले जात आहेत.

नगर परिषद गडचिरोलीच्या वतीने मंगळवारी शहरात भव्य तिरंगा सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. इंदिरा गांधी चौकातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहापासून सुरू झालेली ही रॅली हातात तिरंगा धरून, देशभक्तीपर घोषणांनी शहरातील मुख्य मार्गांवरून निघाली. या रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

रॅलीत नगर परिषद कर्मचारी, शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक, सायकल स्नेही मंडळ, क्रीडापटू, स्वयंसेवी संस्था, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने गडचिरोलीकर नागरिक सहभागी झाले. रॅलीचा समारोप एकता पार्क येथे झाला, जिथे सहभागींसाठी लघु देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाने शहरात देशभक्तीचा उत्साह संचारला.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!