कौशिक अंबानीचा सपत्नीक महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित
1 min readदेसाईगंज (वार्ता) :ई-लर्निंग शिक्षणातील सर्वोत्कृष्ट स्टार्टअप ऍप्स असून ई-स्कॉलर या शैक्षणिक ऍप्सने अपवादात्मक आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरलेली विना इंटरनेट शिवाय चालणाऱ्या ई-स्कॉलर ऍप्सचे संचालक कौशिक अंबानी व प्रियंका कौशिक अंबानी यांना दि. २९ जानेवारी २०२३ ला महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२३ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
हा दिमाखदार सोहळा महाराष्ट्र सोसायटीज वेलफेअर असोसिएशन-महासेवा आणि पीआर पार्टनर्स रेड अँट मुंबईतील हयात सेंट्रिक जुह मुंबई येथे पार पडला. हा पुरस्कार मुंबई शहर पालकमंत्री तथा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर पालकमंत्री तथा पर्यटन आणि कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते कौशिक अंबानी व प्रियंका कौशिक अंबानी यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी अँड. अखिलेश चौबे, अतिरेक शर्मा, चित्रपट अभिनेत्री डॉ. आदिती गोवित्रीकर, शैलेश घोडिया, माजी मंत्री कृपाशंकर सिंह, अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे, सुरेश भोसले आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक महासेवाचे अध्यक्ष सीए रमेश प्रभु यांनी केले.