September 6, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

गोंडवाना विद्यापीठात विद्यार्थ्यांना दिलासा: भाग्यश्रीताई आत्राम यांच्या प्रयत्नांनी 2025-26 साठी कॅरी ऑन योजना लागू

गडचिरोली, २० ऑगस्ट : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली अंतर्गत संलग्न महाविद्यालयांमधील अनेक विद्यार्थी मागील सत्रात काही विषयांमध्ये नापास झाले होते. नवीन शैक्षणिक धोरणामुळे अभ्यासक्रमाचा सिलेबस आणि संदर्भ साहित्य वेळेत उपलब्ध न झाल्याने विद्यार्थी व प्राध्यापकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. याचा थेट परिणाम निकालांवर झाला, ज्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना विशेषतः अंतिम वर्षाच्या प्रवेशात अडचणींचा सामना करावा लागला.

या समस्येकडे लक्ष वेधत विद्यार्थ्यांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तसेच विद्यापीठ सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम यांच्याकडे निवेदन सादर केले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी भाग्यश्रीताईंनी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. यापूर्वी 2023-24 आणि 2024-25 या शैक्षणिक वर्षांमध्ये लागू केलेल्या कॅरी फॉरवर्ड योजनेचा शेकडो विद्यार्थ्यांना लाभ झाला होता. मात्र, यंदा नवीन धोरणामुळे निर्माण झालेल्या गोंधळामुळे उत्तीर्णतेचे प्रमाण कमी राहिले.

गडचिरोली-चंद्रपूरसारख्या नक्षलग्रस्त व जंगलव्याप्त भागातील अल्पशिक्षित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी भाग्यश्रीताईंनी 2025-26 साठी पुन्हा कॅरी ऑन योजना लागू करण्याची मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत कुलगुरूंनी तत्काळ ही योजना लागू केली असून, सर्व विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

या प्रसंगी नगरसेवक अमोल भाऊ मुक्कावार, सुमित मोतकुरवार, प्रा. पेंदाम, हिमा भाऊ एड., राकेश तोरे एड., जोगे यांच्यासह विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांमधील शेकडो विद्यार्थी उपस्थित होते. भाग्यश्रीताईंच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांचे शैक्षणिक भवितव्य सुरक्षित झाले आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!