September 12, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

डॉ. परशुरामजी खुणे सांस्कृतिक कार्य प्रेरणादायी; वामनरावजी फाये यांचे प्रतिपादन

झाडीपट्टी रंगभूमीचे नटसम्राट पद्मश्री डॉ.परशुराम खुणे यांचा आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्था कुरखेडा कडून सत्कार

कुरखेडा, प्रतिनिधी;

मागील पन्नास वर्षापासून झाडीपट्टीच्या रंगभूमीवर विविध भूमिका साकारून अनेक नवोदित कलावंतांना कला क्षेत्रात प्रोत्साहित करणारे कुरखेडा तालुक्यातील गुरनोली येथिल जेष्ठ नाट्यकर्मी डॉ. परशूराम खुणे यांचे सांस्कृतिक कार्य प्रेरणादायी असुन त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेवुन शासनाने पद्मश्री पुरस्कार जाहिर करुन सन्मानित केलेले अभिनंदन बाब असल्याचे प्रतिपादन आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्था चे संचालक तथा विश्व हिंदु परिषदेचे जिल्हा अध्यक्ष वामनरावजी फाये यांनी केले

ते आदिवासीं ग्रामीण विकास शिक्षण संस्था कुरखेडा वतिने नुकतीच पद्मश्री पुरस्कार प्राप्त झालेल्या डाँ परशुराम खुणे यांच्या सत्कार सोहळा कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
यावेळी सत्काराला उत्तर देतांना डाँ परशुराम खुणे यांनी पद्मश्री पुरस्काराचा सन्मान हा माझा नसून सर्व झाडीपट्टीतील रसिक माय बाप प्रेक्षकांचा व कलावंताचा आहे त्यामुळे त्यांनी केंद्र सरकारचे मनापासून आभार मानले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हटले की जीवन जगताना संगत जर चांगली मिळाली तर योग्य दिशा मिळत असते त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना चालना देण्याकरिता योग्य संस्काराची निवड करावी असे प्रतिपादन केले. यावेळी डाँ खुणे यांनी विद्यार्थ्यांना अभिनयाची झलक दाखवून त्यांच्या सोबत संवाद साधला.
यावेळी डाँ परशुरामजी खुणे यांचा वामनरावजी फाये व दोषहरजी फाये यांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देवुन सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वामनराव फाये सत्कारमूर्ती पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, संस्था सचिव दोषहर फाये, पुर्व सिनेट सदस्य तथा भाजयुमो जिल्हा अध्यक्ष संस्था सहसचिव प्रा नागेश्वर फाये,प्राचार्य. एल. डब्लू. बडवाईक, संस्कार पब्लिक स्कूल चे प्राचार्य. देवेंद्र फाये, उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सिनेट सदस्य चांगदेव फाये , संचालन प्रा. विनोद नागपूरकर तर आभार प्रा. नागेश्वर फाये यांनी केले.
यावेळी संस्कार पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व श्रीराम विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय व वाणिज्य विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय कुरखेडा येथील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!