March 7, 2026

कुरखेडा येथे २८ ऑगस्टला जनता दरबार: एकाच ठिकाणी सर्व समाधाने

“कुरखेडा तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन”

कुरखेडा, २५ ऑगस्ट : कुरखेडा तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांच्या विविध शासकीय विभागांशी संबंधित अडीअडचणी, समस्या आणि प्रश्नांची त्वरित आणि प्रभावी सोडवणूक करण्यासाठी तहसील कार्यालय, कुरखेडा यांच्या वतीने जनता दरबाराचे आयोजन करण्यात येत आहे. हा जनता दरबार दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजी गुरुवारी सकाळी ११:०० वाजता किसान मंगल कार्यालय, कुरखेडा येथे होणार आहे.

मा. रामदास मसराम, आमदार (६७ आरमोरी विधानसभा क्षेत्र) यांच्या पत्राच्या संदर्भानुसार, या उपक्रमाद्वारे नागरिकांना एकाच ठिकाणी त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याची संधी उपलब्ध होईल. तहसीलदार, कुरखेडा यांनी सर्व मंडळ अधिकाऱ्यांना (कुरखेडा, पुराडा, कढोली, मालेवाडा) त्यांच्या कार्यक्षेत्रातील ग्राम महसूल अधिकाऱ्यांमार्फत नागरिकांमध्ये या जनता दरबाराबाबत जनजागृती आणि प्रसिद्धी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, सर्व संबंधितांना नियोजित वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या जनता दरबारामुळे कुरखेडा तालुक्यातील नागरिकांच्या समस्या शासकीय स्तरावर त्वरित सोडवण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मा. जिल्हाधिकारी, गडचिरोली आणि उपविभागीय अधिकारी, कुरखेडा यांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!