September 6, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

आर्थिक स्वावलंबनासाठी संस्कार पतसंस्था आदर्श – ग्राहक मेळाव्यात मार्गदर्शन

“संस्कार पतसंस्था: आर्थिक स्वावलंबनाचा विश्वासार्ह मार्ग – शेखर चारेगावकर”

देसाईगंज, २६ ऑगस्ट : पतसंस्थांना आयकर लागू नसल्याने ठेवींवर टी.डी.एस. कपात होत नाही, तर शेअर मार्केट, म्युच्युअल फंड आणि सोने यांसारख्या अस्थिर गुंतवणुकींमुळे होणारे नुकसान टाळता येते. त्यामुळे संस्कार पतसंस्था हा आर्थिक स्वावलंबनाचा सर्वोत्तम पर्याय आहे, असे प्रतिपादन माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद (राज्यमंत्री दर्जा) शेखर चारेगावकर यांनी केले.

संस्कार क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी मर्यादित, गडचिरोलीच्या वडसा विस्तार कक्षाचा भव्य ग्राहक मेळावा १९ ऑगस्ट २०२५ रोजी देसाईगंज येथील गजानन महाराज मंदिर सभागृहात पार पडला. यावेळी चारेगावकर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ उद्योजक राजेंद्र अग्रवाल यांनी केले, तर अध्यक्षस्थानी अनिल मेंढे, अध्यक्ष लोकमंगल समूह, आसगाव उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मनिष फाये, अध्यक्ष गुणवंत फाये, माजी उपाध्यक्ष चांगदेव फाये, प्रा. नागेश फाये, देवेंद्र फाये आणि मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज बांगरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

चारेगावकर यांनी पतसंस्थांच्या गुंतवणुकीचे फायदे, बँका आणि फायनान्स कंपन्यांपासून असलेले वेगळेपण आणि संस्थेच्या ठेव व कर्ज योजनांची सविस्तर माहिती दिली. यावेळी वडसा येथील सभासदांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. संस्थापक अध्यक्ष मनिष फाये यांनी सभासदांना संस्थेच्या योजनांमध्ये गुंतवणूक करून संस्थेचा भाग होण्याचे आवाहन केले. संस्थेने पुढील आर्थिक वर्षात ५० कोटी ठेवींचा टप्पा गाठण्याचा निर्धार जाहीर केला.

प्रास्ताविक धीरज बांगरे यांनी केले, तर स्विटी खरवडे यांनी संचालन आणि सूरज सुकारे यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विलास लोखंडे, राजकुमार गजपल्ला, शरद ढोरे, दिवाकर देवांगन, प्रल्हाद लंजे, नामदेव गुरनुले, राजु टेंभुर्णे, तुषार येलतुरे आणि हेमंत खरवडे यांनी मोलाचे योगदान दिले.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!