September 6, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

“आमदार रामदास मसराम यांचा पुढाकार: कुरखेड्यात जनता दरबाराचे आयोजन”

कुरखेडा, २७ ऑगस्ट : तालुक्यातील ग्रामीण शहरी भागातील नागरिकांच्या विविध शासकीय विभागांशी संबंधित अडीअडचणी, समस्या प्रश्नांची तात्काळ सोडवणूक करण्यासाठी कुरखेडा येथे 28 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11:00 वाजता किसान मंगल कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कृषी, महावितरण, महसूल, पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम, अन्न नागरी पुरवठा, पोलीस, वन, भूमी अभिलेख यासह इतर विभागांचे अधिकारी उपस्थितराहतील.

नागरिकांच्या तक्रारी नोंदवून त्यावर त्वरित कार्यवाही केली जाईल. सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संधीचा लाभघ्यावा, असे आवाहन आमदार रामदास मसराम (67-आरमोरी विधानसभा क्षेत्र) यांनी केले आहे.

दिनांक:28 ऑगस्ट 2025

वेळ: सकाळी 11:00

स्थळ: किसान मंगल कार्यालय, कुरखेडा

About The Author

You may have missed

error: Content is protected !!