March 7, 2026

“भाजपच्या सत्तेत स्वपक्षियालाच ‘भीक मांगो’ची वेळ! माजी नगराध्यक्षाचा निषेध आंदोलनसहभागाने सरकारची पोलखोल”

नागपूर/कुरखेडा, २७ ऑगस्ट : महाराष्ट्रातील भाजप सरकारच्या सत्ताकारभाराने आता स्वतःच्या पदाधिकाऱ्यांनाच रस्त्यावर ‘भीक मांगो’ आंदोलन करण्यास भाग पाडले आहे. कुरखेडा नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष व स्वीकृत सदस्य, तसेच जिल्हा महामंत्री असलेले आणि कुरखेडा येथील कंत्राटदार रवींद्र गोटेफोड हे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते. मात्र, काल (२६ ऑगस्ट) नागपूर येथे कंत्राटदार संघटनेने आयोजित केलेल्या ‘भीक मांगो’ आंदोलनात त्यांनी सहभाग घेत मुख्यमंत्र्यांचा जाहीर निषेध केला. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने आता लोकांच्या प्रश्नांची झोड उडवली आहे: “भाजपने काय दिवस आणले? सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारीच भीक मागत असतील, तर सामान्य लोकांची काय वेळ येईल?”

रवींद्र गोटेफोड हे भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जातात. कुरखेडा नगर पंचायतीचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी पक्षाच्या सत्तेसाठी अनेकदा रस्ते तापले. मात्र, आता स्वतःच्या पक्षाच्या सत्तेविरोधात ‘भीक मांगो’ प्लॅकार्ड घेऊन काळी टीशर्ट ज्यावर “पैसे द्या, पैसे द्या देवाभाऊ , पैसे द्या” असे स्लोगन लिहिलेले होते ती घालून, रस्त्यावर उतरण्याची नामुष्की ओढावली आहे. कंत्राटदार संघटनेच्या या आंदोलनाचे कारण म्हणजे कंत्राटी कामांचे थकलेले पैसे मिळवण्यासाठी कंत्राटदारांना विवंचनेत टाकणारी शासनाची उदासीनता. गोटेफोड यांच्या कंत्राटाच्या कामाचे पैसे मिळावेत म्हणून ते नागपूरला आले होते. मात्र, आंदोलनात सहभाग घेताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारचा जोरदार तिरस्कार केला, ज्यामुळे स्वपक्षाला घरचे आहेर देण्याची वेळ आली.

सोशल मीडियावर या फोटोंनी धुमाकूळ घातला असून, नेटकऱ्यांकडून भाजप सरकारवर थट्टा उडवली जात आहे. एका व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे, “भाजपचे पदाधिकारीच भीक मागत असतील, तर आम्हाला काय करायचे? सरकारने कंत्राटदारांना त्रास देऊन विकास थांबवला आहे!” दुसऱ्या पोस्टमध्ये, “माजी नगराध्यक्षाला मुख्यमंत्र्यांचा निषेध करावा लागेल, हीच तर भाजपची ‘अच्छी’ सत्ता आहे. सत्तासमर्थकांना भीक मागावी लागते, तर विरोधकांची काय गती?” असे लिहिले आहे. या घटनेमुळे कुरखेडा ते नागपूरपर्यंतच्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाची लाट उसळली असून, “पक्ष नेतृत्वाने कंत्राटदारांच्या समस्या सोडवल्या नाहीत तर आम्हीच रस्त्यावर येऊ” अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

कंत्राटदार संघटनेच्या या आंदोलनाची पार्श्वभूमी अशी की, महाराष्ट्र सरकारकडून कंत्राटी कामांचे कोट्यवधी रुपयांचे बिले थकित आहेत. कंत्राटदारांना पैसे मिळत नसल्याने त्यांचे व्यवसाय धोक्यात आले आहेत. गोटेफोड सारखे स्थानिक नेतेही या संकटात सापडले असून, त्यांच्या आंदोलनाने भाजप सरकारच्या ‘विकास’ धोरणावर प्रश्नचिन्ह उपटले आहे. भाजपचे नेते नेहमी ‘सबका साथ, सबका विकास’ असा जुमला मारतात, पण आता स्वतःच्या लोकांना ‘भीक मांगो’ करावे लागत असेल तर हा विकास कोणाचा? असा सवाल उपस्थित होत आहे.

या घटनेने महाराष्ट्रातील भाजप सरकारची पोल खुलली असून, सत्ताधारी पक्षाच्या अंतर्गत कलहाची ही नांदी असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. कुरखेडा येथील स्थानिक कार्यकर्ते म्हणतात, “गोटेफोडसारखे नेते पक्षासाठी झटतात, पण सरकारने त्यांच्याकडूनच दुर्लक्ष केले. आता लोक विचारत आहेत की, भाजपची सत्ता असताना कंत्राटदारांना भीक मागावी लागेल तर विरोधी पक्षांच्या लोकांची काय स्थिती?” ही घटना भाजपला धोक्याची घंटा म्हणून पाहिली जात असून, येत्या काळात अशा आंदोलनांची संख्या वाढेल, असे अपेक्षित आहे.

“मी एक कंत्राटदार आहे. कंत्राटदार संघटनेने आपल्या हक्काच्या पैश्यासाठी पुकारलेल्या आंदोलनात मी कंत्राटदार म्हणून समर्थन देत सहभागी झालो होतो. यात काही गैर नाही. शासनाने सदर आंदोलनाची गांभीर्याने दाखल घडवून कंत्राटदारांचे थकीत बिल रक्कम लवकरात लवकर अदा करावे. रवींद्र गोटेफोडे, (कंत्राटदार तथा जिल्हा महामंत्री भारतीय जनता पार्टी, माजी नगराध्यक्ष)”

About The Author

You may have missed

error: Content is protected !!