September 6, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

आदि कर्मयोगी अभियान : गडचिरोलीत ब्लॉक मास्टर ट्रेनर प्रशिक्षणाला उत्साहात सुरुवात

गडचिरोली,  ५ सप्टेंबर : आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारच्या आदि कर्मयोगी अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात ब्लॉक मास्टर ट्रेनर प्रशिक्षणाला कालपासून उत्साहात सुरुवात झाली. सेमाना रोडवरील एकलव्य मॉडेल रेसीडेन्शियल स्कूल येथे प्रकल्प अधिकारी रणजित यादव आणि अहेरी येथे प्रकल्प अधिकारी कुशल जैन यांच्या हस्ते प्रशिक्षणाचा शुभारंभ झाला.

या तीनदिवसीय प्रशिक्षणात आठ मास्टर ट्रेनरमार्फत सात महत्त्वाच्या मुद्यांवर मार्गदर्शन केले जात आहे. यामध्ये पारदर्शक प्रशासन, तळागाळापासून नियोजन, तक्रार निवारण, राष्ट्रीय-राज्य योजनांचे एकत्रित अंमलबजावणी, विकसित भारत २०४७ च्या दृष्टिकोनाशी सुसंगत स्थानिक योजना, गावपातळीवर नेतृत्वनिर्मिती आणि योजनांचे शेवटच्या घटकापर्यंत वितरण यांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील १२ ब्लॉकमधील ४४१ गावांचे क्लस्टर तयार झाले असून, पुढील टप्प्यात ब्लॉक ट्रेनर गावांमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षण देतील. या उपक्रमामुळे ग्रामपातळीवर जबाबदार आणि परिणामकारक प्रशासनाची पायाभरणी होऊन नागरिकांचा सहभाग वाढेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!