September 7, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

गेवर्धा येथे जश्ने ईद-ए-मिलाद-उन-नबी उत्साहात साजरा, मुस्लिम बांधवांनी काढली भव्य मिरवणूक

ताहिर शेख, कुरखेडा, ५ सप्टेंबर : गेवर्धा येथे इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त जश्ने ईद-ए-मिलाद-उन-नबी मोठ्या उत्साहात आणि शांततेने साजरा करण्यात आला. यानिमित्त रजा जामा मस्जिद येथून सकाळी ८:३० वाजता भव्य मिरवणूक काढण्यात आली, ज्यात गेवर्धा, गुरनोली, वडेगाव, नान्ही येथील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. मिरवणुकीत ‘नारे-ए-तकदीर, अल्ला हो अकबर’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला.

हाफिज इझहार रजा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुस्लिम समाजाचे अध्यक्ष नासिर पठान, उपाध्यक्ष भोला खान पठान, सचिव रोशन अली सय्यद, सहसचिव ताहिर शेख, इंतजामिया कमेटी अध्यक्ष मुजफ्फर पठान, सचिव सरफराज मिर्जा, टंटा मुक्ति समिती अध्यक्ष राजू बारई, तसेच वरिष्ठ निजाम शेख, जावेद शेख, शमीम भाई, तैसीम मिर्जा, तौसिफ मिर्जा, इब्राहिम मिर्जा, नावेद शेख, फैजान पठान, हफीज पठान, वहीद पठान, बबलू भाई शेख, रेहान पठान, शाहरुख पठान, तबरोज शेख, मोनू शेख, अल्फैज शेख, जिशान शेख, रेहाज शेख, अताउल्ला पठान, अयफाज शेख, बाबा भाई शेख, शमीउल्ला पठान, फिरोज शेख, फिरोज पठान, हम्जा शेख, जिहान शेख, मुन्ना सय्यद, मुशर्रफ सय्यद, रेहान शेख, फरहान शेख यांच्यासह अनेकांनी मिरवणूक आणि जलशामध्ये सक्रिय सहभाग घेतला.

या प्रसंगी मशिदींमध्ये विशेष नमाज अदा करण्यात आले, कुराण पठण झाले आणि हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणींची आठवण करून देण्यात आली. पारंपारिक खाद्यपदार्थ तयार करून गरिबांमध्ये वाटप करण्यात आले. हिरव्या रंगाचे कपडे आणि धागे परिधान करून मुस्लिम बांधवांनी उत्साहाने हा सण साजरा केला. कार्यक्रम शांततेत आणि आनंदाने संपन्न झाला, ज्यामुळे सामाजिक एकोप्याचा संदेश सर्वत्र पसरला.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!