September 6, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

श्रीराम विद्यालयाचा कुरखेडा तालुका क्रीडा स्पर्धेत दबदबा: खो-खो आणि कबड्डीत जिल्हास्तरावर झेप

कुरखेडा, ११ सप्टेंबर : विकास विद्यालय तथा थोरवी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, कुरखेडा येथे ८ सप्टेंबर २०२५ पासून सुरू झालेल्या तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत श्रीराम विद्यालय, कुरखेडा येथील १४ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांनी खो-खो आणि कबड्डी स्पर्धेत दमदार कामगिरी करत जिल्हास्तरावर स्थान मिळवले आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत श्रीराम विद्यालयाच्या मुलांनी आणि मुलींनी चुरशीच्या लढतीत बाजी मारली.

मुलींच्या संघाने खो-खो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला, तर मुलांनी खो-खो आणि कबड्डी दोन्ही स्पर्धांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करत विजय मिळवला. या यशामुळे विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.

आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष तसेच शाळा समितीचे अध्यक्ष वामनराव फाये, संस्था सचिव दोषहरराव फाये, सहसचिव व प्राचार्य नागेश्वर फाये यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनीही आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक शिक्षकांना देत त्यांचा सन्मान केला.

हे यश श्रीराम विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील सातत्यपूर्ण उत्कृष्टतेचे द्योतक आहे. आता सर्वांचे लक्ष जिल्हास्तरीय स्पर्धेतील त्यांच्या कामगिरीकडे लागले आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!