March 7, 2026

कोरचीत MGNREGA च्या अंमलबजावणीसाठी आम आदमी पार्टीचे निवेदन; नगर पंचायतीला 15 दिवसांचा अल्टिमेटम

कोरची, गडचिरोली, 15 सप्टेंबर :  आम आदमी पार्टी, गडचिरोलीच्या वतीने कोरची नगर पंचायत क्षेत्रात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (MGNREGA) अंमलबजावणी त्वरित सुरू करण्याच्या मागणीसाठी आज नगर पंचायत कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. गेल्या 10 वर्षांपासून योजनेची अंमलबजावणी बंद असल्याने अकुशल मजुरांचे स्थलांतर, शेती विकासाला खीळ आणि ग्रामीण पायाभूत सुविधांचा अभाव अशा गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

निवेदनात शासन निर्णयांचे (3 मार्च 2014 आणि 18 नोव्हेंबर 2021) उल्लंघन होत असल्याचा आरोप करत, जॉब कार्ड वितरण, किमान 100 दिवसांचा रोजगार, शेततळे-विहिरींचे काम, मजुरीचे तात्काळ वितरन आणि पारदर्शक नियोजन यासह ठोस मागण्या मांडण्यात आल्या. आदिवासीबहुल आणि नक्षलग्रस्त कोरचीत योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे मजुरांना रोजगार आणि शेतकऱ्यांना शेती विकासाचे लाभ मिळतील, असे पक्षाने म्हटले आहे.

आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष नसीर हाशमी यांच्या मार्गदर्शनात तालुका अध्यक्ष धम्मदीप राऊत यांच्या नेतृत्वाखाली संघटकमंत्री हिरा उईके, शहर अध्यक्ष संजय चौधरी यांच्यासह संगीता कल्यारी, श्याम कला शहारे, कुमारी बाई फुल कुवर, निराशा सोनकुखुरा, धर्म तीन बाई भोयर, चंपा सोनार, यशवंतीन मिरी, यशोदाबाई गुगुवा, धन बाई घुगवा, सुशीला शेंद्रे, दिनाबाई भगवा, वैष्णवी कोरेटी, देवली मसराम, रुपेश पोरेटी, केसरी शर्मा, आशा चंद्र हा शर्मा, मानबाई भगवा, कंगलू भगवा, ममता भोयर, परदेसी भगवा, नरेंद्र शेंद्रे, शारदा भगवा, समसेद शेख, रक्षण शेख, मालतीबाई झोका, प्रसारम मिरी, गायत्रीबाई मडावी, सुनबाई बांजर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

पक्षाने नगर पंचायतीला 15 दिवसांत प्रगती अहवाल सादर करण्याची मागणी केली असून, अन्यथा शेतकरी आणि मजुरांच्या हक्कांसाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!