10 फेब्रुवारी रोजी पंचायत समिती गडचिरोलीची आमसभा
1 min readगडचिरोली, प्रतिनिधी, दि.0५, पंचायत समिती गडचिरोलीची वार्षिक आमसभा सन 2022-23 दिनांक 10 फेब्रुवारी रोजी 11.00 वाजता जिल्हा परिषद,हायस्कुल (मा.शा.) तथा कनिष्ट महाविद्यालय,चामोर्शी रोड,गडचिरोली येथिल सभागृहात आमदार डॉ.देवराव होळी यांचे अध्यक्षतेखाली पुढीलप्रमाणे कामकाज चालविण्याकरीता आयोजित केलेली आहे. तरी सदर आमसभेला संपुर्ण माहितीसह विभाग प्रमुखांनी उपस्थित राहावे असे सचिव तथा गटविकास अधिकारी पंचायत समिती,गडचिरोली यांनी कळविले आहे.