December 23, 2024

शेतीच्या नावाने परवानगी घेऊन थेट नदीच्या पात्रातून रेती उत्खनन केली जाते

1 min read
  • येथील सती नदीत होत असलेल्या अवैध रेती उत्खननाची थेट मुख्यमंत्र्यांना तक्रार

गडचिरोली येथे नव्याने स्थापन झालेल्या मुख्यमंत्री कक्षात निवेदन सादर केले.

रेतीचा ट्रक जाण्याकरिता अवैद्य केली वृक्षतोड वन विभाग मात्र झोपेत.

अरत्तोंडी येथील शेतीच्या नावावर परवानगी मिळवून नवरगाव येथील नदी पत्रातून परवानगी पेक्षा अधिक अवैधरीत्या रेती उत्खनन करणाऱ्यावर कार्यवाही कारणे बाबत तक्रार येथील शेतकरी संजय कारुजी कवाडकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच केली आहे.

अरत्तोंडी येथील सती नदी लागत असलेल्या शेतकऱ्यांच्या नावावर शेतातील रेती उपसा करून घेणे करिता मा. जिल्हाधिकारी गडचिरोली याचे कडून शेतातील रेती काढण्या करिता परवानगी मिळवून, शेतातील रेती उपसा न करता प्रत्यक्षात सती नदी पात्रातील व नवरगाव शेत शिवारातील दुसऱ्या बाजूने मोठ्याप्रमाणावर उत्खनन सुरू असल्याचे निदर्शनास येताच अर्जदार संजय कवाडकर याने यांना मज्जाव केला. परंतु आमची सर्व वर पर्यंत सेटिंग आहे तुला जे जमते ते करून टाक असे उद्धट पने उत्तर देत ज्या ठिकाणी परवानगी नाही त्या नदी पत्रातून उपसा सुरू ठेवला.

जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या शेतीमधील रेतीच्या उपश्याच्या परवानगीच्या ही तिप्पट रेती आज दिनांका पर्यंत या नदी पत्रातून उपसा झालेली आहे असा आरोप कवाडकर यांनी निवेदनटून केला आहे .

ज्या ठिकाणी प्रत्यक्षात उत्खनन केले जात आहे त्या ठिकाणी कवाडकर यांची वहिवाट असलेली शेती असून तो भाग नवरगाव आंधळी क्षेत्रात मोडतो. अरत्तोंडी येथील परवानगी मिळवून मनमर्जी ने आंधळी येथून मुजोरीने उत्खनन केले जात आहे हे विशेष.

शेतीतील जमीन वापरण्याजोगी करण्याच्या नावावर येथे प्रत्यक्षात अवैध रेती उत्खनन वैद्य ठरविण्याचे प्रकार सुरू आहेत. सादर गैरप्रकारांची योग्य चौकशी करून या अवैध उपसा मुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पर्यावरणाचे समतोल राखावे म्हणून रेती घट लिलाव करतांना खूप जाचक अटी असल्याने व मोठ्या रकमेची अनामत रक्कम शासनाला जमा करण्यात येते. त्यामुळे आता हे रेती उत्खनन करणाऱ्यां टोळी ने शेतातील रेती उपसा कडे आपला कल केला असून शेतीतिल रेती उपसाच्या नावावर नदी पत्रातून मनमर्जी उत्खनन करून मोठ्याप्रमाणात गैरप्रकार सुरू आहेत.

सदर प्रकरणाची योग्य दखल घेवून दोषी वर योग्य ती कार्यवाही करावी अशी विनंती त्यांनी तक्रारीतनमूद केली आहे.

*सदर प्रकाराबाबत येथील तहसीलदार सोमनाथ माळी यांना संपर्क केला असता त्यांनी सदर जागा भूमी अभिलेख कडून मोजणी करून जर अवैध उपसा झाला असेल तर योग्य दंडात्मक कार्यवाही प्रस्तावित केले जाईल असे सांगितले*.

रात्र दिवस अवैद्य रेतीचा उपसा करून रेती तस्कर मालामाल होत आहे तर दुसरीकडे एखादा गरजु व्यक्ती घरगुती कामाकरिता एकाधि ट्रीप मुरूम अथवा रेती आणत असल्यास रेती तस्कर माञ महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना फोन करून त्यांचा ट्रॅक्टर पकडण्याकरिता भाग पाडतात माञ रात्र दिवस रेती तस्कर शेतीच्या नावावर उपसा करत आहेत हे महसुल विभागला कळत नाही का असा नागरिकांचा सवाल आता नागरीक विचारत आहेत? आता या अट्टल रेती तस्करावर काय कारवाई महसूल विभाग करते या कडे परिसरातील नागरिकांचा लक्ष लागलेला आहे.

About The Author

error: Content is protected !!