शेतीच्या नावे केलेली सती नदी पात्रातून अवैध रेती उत्खनन लपविणे साठी नदी पत्रातील रेती रापडीने सपाट केले.
1 min readट्रॅक्टर रापडी लावून उत्खनन केले मोठे मोठे खड्डे बुजविले.
कुरखेडा तालुक्यातील रेती उत्खनन मध्ये गुंतलेल्या टोळीने अरत्तोंडी येथील शेतकऱ्यांच्या नावे शेतीतील रेती उपसा करण्याचा परवाना मिळवून चक्क नवरगाव हद्दीतील सती नदी मध्य पात्रातील रेती उत्खनन सुरू केले होते.
नवरगाव येथील शेतकरी संजय कवाडकर यांनी जिल्हा मुख्यालयात स्थापन झालेल्या मुख्यमंत्री तक्रार निवारण कक्ष येथे सदर गैरप्रकारची तक्रार नोंदणी करताच आज सती नदी पात्रातून रेती उपसा थांबवून चक्क ट्रॅक्टर रापडी लावून उत्खनन केलेले खड्डे बुजविण्याचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आलेले आहे.
जरी नदी पत्रातील खड्डे बुजवून केलेले कृत्य लपविण्याचा प्रकार केला असला तरी नदी पत्रातून उपसा केलेली रेती अवैध रित्या याच क्षेत्रात साठवणूक करून ठेवलेली आहे. या साठा रेती मधून २४ तास रेती बाहेर पाठविली जात आहे. वीना परवाना होणाऱ्या सदर रेती वाहतुकीवर अजून पर्यंत प्रशासनाने कोणतीच कार्यवाही न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अरत्तोंडी येथील परवानगी मिळवून नवरगाव हद्दीतील उपसा सुरू असल्याची तक्रार येथील मुख्यमंत्री तक्रार निवारण कक्ष येथे झाल्याची चाहूल लागताच आपली बाजू सावरत केलेले अवैध उत्खनन लपविणे करिता आज सती नदी पात्रात ट्रॅक्टर लावून सपाटीकरण करीत उत्खनन केले खड्डे बुजविण्याचे निदर्शनास येताच येथील नागरिकांनी त्याचे छायाचित्र काढून प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना पाठविले आहे हे विशेष.
येथे होत असलेल्या सदर गैरप्रकारची उच्च स्तरीय चौकशी होणे गरजेचे झाले आहे अशी भावना व्यक्त केली जात आहे. सर्वसामान्य नागरिक एखादी बैल बंडी ने स्वतः करिता रेती काढत असल्यास त्यावर दंडात्मक कार्यवाही केली जाते. परंतु या रेती उपसा टोळी कडून सर्व नियम डावलून मंजूर नसलेल्या ठिकाणी रेती उपसा केली गेली असताना सुद्धा ज्या प्रकारे त्यांना अभय दिला जात आहे या वर चौकशी होणे आवश्यक आहे असे बोलले जात आहे.