March 7, 2026

कुरखेड्यात महामार्ग बांधकामातील निष्काळजीपणामुळे दुचाकीस्वार जखमी; सुरक्षा उपायांचा अभाव, नागरिकांचा संताप

कुरखेडा (कुंवर लोकेंद्रशाह सयाम – विशेष प्रतिनिधी) २१ डिसेंबर : कुरखेडा येथे सुरू असलेल्या महामार्ग बांधकामात कंत्राटदाराच्या निष्काळजी वागण्यामुळे लोकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. नवीन बस स्टॅटंड ते निना पेट्रोल पंप दरम्यानच्या महामार्गावरील खोदकाम आणि बांधकाम स्थळी बॅरिकेड टेप किंवा कॉशन टेप लावणे बंधनकारक असतानाही येथे कोणतीही दक्षता घेतली नाही. याच निष्काळजीपणामुळे आज सकाळी सुमारे ७ वाजता मोठी दुर्घटना घडली.

आंधळी येथील देवानंद भोंडे (वय २३) व सागर शेडमाके (वय १८) यांच्या दुचाकीला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कोरचीकडे जाणाऱ्या बसने धडक दिली. धडकेने दुचाकीस्वार दुचाकीसह खोदकाम केलेल्या ढिगाऱ्यावर दुचाकी सह  पडले, त्यामुळे त्यांना किरकोळ जखमा झाल्या. प्राथमिक उपचार घेऊन ते घरी परतले असल्याचे समजते. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले.

महामार्ग बांधकामामुळे नागरिकांना सतत अडचणींचा सामना करावा लागत आहे. सुरक्षा उपाय न घेतल्याने अशा अपघातांचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. बांधकाम ठिकाणी नियमांचे पालन करून सुरक्षिततेसाठी बॅरिकेडिंग आणि चेतावणी फलक लावावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष द्यावे, अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते, असा इशारा ग्रामस्थ देत आहेत.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!