September 8, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

सावधान! नायलॉन मांजा वापरला किंवा विकला तर भरावा लागेल लाखोंचा दंड – उच्च न्यायालयाचा कठोर इशारा

गडचिरोली, दि. २६ डिसेंबर : मकर संक्रांतीच्या उत्सवात पतंग उडवण्याची मजा घेणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा! प्राणघातक नायलॉन मांजा (चायनीज मांजा) वापरणे किंवा विक्री करणे आता अत्यंत महागात पडणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विदर्भातील सर्व जिल्ह्यांसाठी कठोर दंडाची तरतूद प्रस्तावित केली आहे. यानुसार, **नायलॉन मांजा वापरणाऱ्यांना ५०,००० रुपये**, तर **विक्रेत्यांना प्रति उल्लंघन २,५०,००० रुपये** दंड ठोठावला जाऊ शकतो!

नायलॉन मांजामुळे दरवर्षी अनेक मानवी जीव जातात – दुचाकीस्वारांचे गळे चिरले जाणे, गंभीर जखमा होणे आणि हजारो पक्ष्यांची क्रूर हत्या होणे अशा घटना घडतात. बंदी असूनही हा मांजा बाजारात विकला जातो, याची गंभीर दखल घेत न्यायालयाने जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांना सार्वजनिक सूचना जारी करण्याचे निर्देश दिले आहेत.

कोणावर अल्पवयीन मुलाने नायलॉन मांजा वापरला तर: पालकांना ५०,००० रुपये दंड.
– प्रौढ व्यक्तीने वापरला तर**: ५०,००० रुपये दंड.
– विक्री किंवा साठा आढळल्यास: विक्रेत्यांना २,५०,००० रुपये (अडीच लाख) दंड!

ही कारवाई अंतिम होण्यापूर्वी जनतेला आपले म्हणणे मांडण्याची शेवटची संधी आहे. ५ जानेवारी २०२६ रोजी नागपूर खंडपीठात होणाऱ्या सुनावणीत हजर राहून आक्षेप नोंदवता येतील. जर कोणीही उपस्थित राहिले नाही, तर दंड लागू होईल आणि याला जनतेची संमती आहे असे गृहीत धरले जाईल.

जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, बंदी असूनही नायलॉन मांजाचा वापर किंवा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल. पतंग उडवण्याची मजा घ्या, पण सुरक्षित कापसाच्या मांजाचा वापर करा – अन्यथा लाखोंचा दंड आणि कायदेशीर अडचण सहन करावी लागेल!

जनतेनो, सावधान रहा! पक्षी आणि मानवी जीव वाचवा – नायलॉन मांजा पूर्णपणे टाळा!

About The Author

error: Content is protected !!