“सती नदी” पत्रातून अवैध “रेती उपसा” मागे हे आहे खरे कारण!
1 min readकुरखेडा,(प्रतिनिधी) ७ फेब्रुवारी ;
मागील कित्येक दिवसापासून नवरगाव अरत्तोंडी या नदी पत्रातून अवैध रेती उपसा बाबत बातम्या प्रकाशित होत आहेत. ह्या उपसा मागील नेमके कारण आता समोर येवू लागले आहे.
आपल्याला कल्पना असेलच नवरगाव येथील शेतकरी संजय कवाडकर यांनी तर चक्क मुख्यमंत्री सचिवालय कक्ष येथे थेट तक्रार दाखल करून अवैध उपसा थांबविणे करिता निवेदन सुद्धा सदर केले आहे.
तर आता समजून घेऊ या नेमकी कोणती कारण आहेत की शेतीच्या नावे परवाना मिळवून चक्क सती नदी पात्रातून रेती उपसा होता आहे.
वर्षानुवर्षे अवैध रेती उपसा करून माया जाणवणाऱ्या टोळीला या वर्षी आपल्या या व्यवसाय करिता सुरक्षित मार्ग पाहिजे होता. ज्यात काम ही सुरू राहील आणि बोंब ही होणार नाही. मग शोधाशोध करून शेतीच्या नावाने परवाना मिळवून घेण्याची बाब समोर आली. अरत्तोंडी येथील शेती ही सती नदी लागत असल्याने येथील एका शेतकऱ्याच्या नावाने परवानगी मिळविणे करिता त्याला रेती उपसा मधील एक हिस्सा देवून या टोळक्याने कागद पत्र जुळवा जुडव करून शेती मध्ये वाहून आलेल्या रेती उपसाची परवानगी मिळवली. आता ज्या ठिकाणी रेती उपसा करण्याची परवानगी घेतली त्या भागाची विधिवत मोजणी व कागदी ताबा पावती मिळवून उपसा सुरू केला.
सदर सिमांकित केलेल्या ठिकाणाहून रेती उपसा करून दोन किलोमिटर मुख्यारस्त्या लगत साठा सुरू केला. साठ्या करिता गुरणोली येथील दुसऱ्या एका शेतकऱ्याच्या शेतातील जागेचा करार करून घेतला. जोमाने रेती उपसा सुरू करून साठा झाल्या ने बाहेर गावी रेती घाट सुरू झाल्याची प्रसिद्धी करून मोठे बॅनर लावून विक्रीची सुरुवात झाली.
पण खरी गमत येथूनच सुरू झाली. उपसा केलेल्या शेतातील रेतीची गुणवत्ता बरोबर नसल्याने रेती उचल करण्या करिता बाहेर गावातून येणारे टीप्पर परत जाऊ लागले. रेती बरोबर नाही ही बाब रेती बाजारात पसरली उचल कमी झाली. आता आपले गुंतवणूक केलेले पैसे बुडतील या भीतीने रेती उपसा करणाऱ्या टोळीने चक्क सती नदी मध्य पत्रातून रेती उपसा करण्याची शक्कल लढविली. गावा बाहेर रहदारी नसलेल्या ठिकाणी नदी पात्र असल्याने काहीच होणार नाही असा त्यांचा समज होता. मग काय भूमी अभिलेख, तलाठ्यांनी जागा मोजणी करून सिमांकन केलेल्या झेंड्या निश्चित केलेल्या ठिकाणांहून उचलून दुसरी कडे परस्पर गाडण्यात आल्या. हळू हळू नदी मध्य पात्र पासून नदीच्या दुसऱ्या टोकपर्यंत रेती उपसा सुरू केला. अरत्तोंडी सोडून थेट नवरगाव आंधळी भागातून उपसा झाल्याने नदी पात्रात जागा असलेल्या नवरगाव येथील शेतकऱ्याच्या बोअरवेल पर्यंत उपसा झाल्याने रागावलेल्या शेतकऱ्याने उपसा बंद करणे करिता हटकले, मात्र तुला जे करायचे ते कर, “आमची सगळ्या सोबत सेटिंग” आहे, असे म्हणत सती नदी मध्य पत्रातून उपसा सुरू ठेवल्याने सदर शेतकरी कायद्याने प्रशासन कडे तक्रार नोंद केली व येथे सुरू असलेल्या अवैध उपश्या कडे सर्वांचे लक्ष गेले.
वरिष्ठ स्तरावर शेतकऱ्याने अवैध उपश्यची तक्रार केल्याने आता आपल्यावर संकट येणार ही कल्पना आल्याने अवैध उपसा करून केलेले मोठ मोठे खड्डे चार – पाच ट्रॅक्टर रापडी लावून सपाट करून घेतले. आता ही टोळी दोन तीन दिवस उपसा केल्या नंतर हीच शक्कल लढवत असून उपसा करून झालेले नदी पात्रातील खड्डे रापडी ट्रॅक्टर लावून रेती समतल करीत आहेत. जर यदा कदाचित या अवैध उपस्याची चौकशी झालीच तर यातून आली सुटका होऊ शकते अशी त्यांची समज आहे.
तक्रार नोंद होताच येथील तहसीलदार सोमनाथ माळी यांनी गुरनोलीचे तलाठी राठोड यांचे सोबत घटनास्थळ गाठून पंचनामा केला अशी माहिती आहे. जागेच्या सिमंकान बाबड शंका असल्याने भूमी अभिलेख सोबत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. पण आज ही शेती सोडून बिनधास्तपणे नदी पात्रातून रेती उपसा सुरू असल्याने एकंदरीत प्रशासनिक कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण केले जात आहेत.