April 25, 2025

#कुरखेडा येथील जयश्री रासेकर यांचे #नगरपंचायत सदस्य अपात्रतेचा उच्च न्यायालयाचा निर्णय २७ फेब्रुवारी पर्यंत लांबणीवर*

‘ अपत्रतेबाबत जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या आदेशाला उच्च न्यालयाची स्थगिती कायम ठेवली.’

“सरकारी पक्षाकडून उत्तर दाखल करण्याकरिता वाढीव मुदत मागितल्याने उच्च न्यायालयाने मुदत मंजूर करीत पुढील तारीख दिली आहे.”

कुरखेडा,दि. ०७/०२/२०२३
कुरखेडा येथील नगर उपाध्यक्ष नगरसेविका जयश्री रासेकर यांना जिल्हाधिकारी यांनी पक्ष व्हीप पालन न केल्याचे कारणावरून अपात्र घोषित केले होते.
जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या अपात्रतेच्या निर्णय विरुद्ध उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ येथे धाव घेत प्रकरण दाखल केले होते.

आज दिनांक ०६ फेब्रुवारी रोजी न्यायाधीश अविनाश जी. घरोटे यांच्या समोर झालेल्या युक्तिवादात आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास व उत्तर दाखल करण्या करिता मुदत सरकारी वकील एड. एन. आर. पाटील यांनी यांनी मागितला तो माननीय न्यालयाने स्वीकार करत मुदत मंजूर करत पुढील २७ फेब्रुवारीला सुनावणी तारीख दिली.
तो पर्यंत जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी पारित केलेल्या अपात्र आदेशाचा प्रभाव आणि प्रक्रिया थांबवले जावी असा आदेश पारित केला होता तो कायम राहील असा आदेशात नमूद केला आहे.

उच्च न्यायालय कडून सदर प्रकरण आदेश पारित होण्यापूर्वीच जिल्हाधिकारी यांच्याकडून राज्य निवडणूक आयोगाला सदर अपात्रतेबाबत माहिती कळवली गेली असल्याची खात्रीलायक माहिती आहे.

येत्या २७ फेब्रुवारी ला होणाऱ्या सादर प्रकरणातील सुनावणी होवून कुरखेडा नगर पंचायतीचे राजकीय समीकरण कुणाकडे वर्ग होतात या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सदर प्रकरणात याचिकाकर्त्या कडून एड. सुमंत यशवंत देवपुजारी यांनी बाजू मांडली व एड. गणेश नारायण खानझोडे यांनी प्रतिवादी यांचे वतीने तर सरकारी बाजू एड. एन. आर. पाटील यांनी युक्तिवाद केला.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!