पिकअप व दुचाकीची समोरासमोर धडक दोघे गंभीर जखमी

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पोहोचविण्यास आपदा मित्रांचे सहकार्य
सिरोंचा 8 फेब्रुवारी ; तालुका मुख्यालयापासून 14 किलोमीटर अंतरावरील आयपीठाजवळ आज दुपारी बाराच्या सुमारास दुचाकी व बोलेरो पिकप यांच्यात समोरासमोर धडकून मोठा अपघात झाला या अपघातात दुचाकी वरील दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांचे नाव नागेश मळे वय 35 व वेगाव कुरसाम वय 55 दोघेही राहणार चित्तूर अशी आहेत.
प्राप्त माहितीनुसार नागेश मळे व वेगा कुरसाम दुचाकीवरून चित्तूर कडे जात होते दरम्यान असरलीवरून सिरोंच्याकडे जाणाऱ्या बोलेरो पिकपची दुचाकी ला समोरासमोर धडक बसली. या अपघातात दुचाकी वरील दोघेही गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच आता मित्र किरण बेदीला व त्यांच्या चमूने कोणताही विलंब न करता अपघात स्थळी दाखल होऊन जखमिंना ग्रामीण रुग्णालय सिरोंचं येथे पाठविले.
प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचाराकरिता गडचिरोली येथे हलविण्याची माहिती आहे. घटनेची माहिती पोलीस स्टेशन सिरोंचा यांना भ्रमणध्वनीद्वारे कळविण्यात आली असून पुढील तपास सीरोंचा पोलीस करीत आहेत. या मार्गावर या पंधरवड्यात ही दुसरी मोठी घटना असून गेल्या पंधरा दिवसात या मार्गावर झालेल्या घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झाला होता पुन्हा या घटनेत दोघे गंभीर जखमी झाले असून महामार्गावरील अपघाताची परंपरा दिवसेंदिवस भीषण होत असल्याचे चित्र आहे.