December 23, 2024

कुरखेडा कोरची मार्गावर वाघाच्या हल्ल्याची चर्चा म्हणजे निवड अफवा;

1 min read

 विभागाने पिंजून काढले पूर्ण परिसर वाघाचे पग मार्क मिळाले मात्र हल्ल्याची कुठलीही खून परिसरात नाही.

कुरखेडा, 8 फेब्रुवारी;
आज सकाळ पासून कुरखेडा परिसरात लेंडारी येथील एका इसमाला वाघाने हल्ला करत जंगल परिसरात ओढत नेल्याची जोरदार चर्चा परिसरात होती.
जांभुरखेडा – लेंडारी परिसरात पट्टेदार वाघ होता हे मात्र खरे पण त्याने एका व्यक्तीला उचलून नेले ही निव्वड अफवा होती.
वन विभागाने ही आज परिसरात चर्चेत असलेल्या या विषयात गांभीर्य दाखवित अख्खे परिसर पिंजून काढले. ज्या भागात वाघाने हल्ला करून एका व्यक्तीस ओढत नेले तेथे वन विभगचे अधिकारी स्वतः जावून निरीक्षण केल्याचे संगितेल जात आहे.
“लांडगा , अलारे ,आला प्रमाणे ” आज कुरखेडा येथे “वाघाने, नेला, रे, नेला” अशी बोंब ऐकायला मिळत होती.
जांभूरखेडा येथून पुराडा कडे प्रवास करतांना मालेवाडा येथील महामार्गाच्या बांधकामावर काम पाहत असलेल्या अभियंत्याला जंगल परिसरातून वाघ मुख्य रस्त्यावर येताना दिसला. सोबतच समोरून सायकील ने एक व्यक्ती ही नजरेस पडला मात्र घाबरलेल्या अभियंत्याने आपली वाहन मागे घेत पड काढला. थोड्या वेळात वाघ गेला असेल असे समजून तो परत त्याच मार्गाने निघाला मात्र त्याला सायकिल स्वर कुठे दिसला नाही. त्याने सायकील स्वराला वाघाने नेले असा गृहीत समजून लेंडारी येथे पोहचून सदर बाब येथील नागरिकांना सांगितली. मग काय वाऱ्या सारखी सदर बाब परिसरात पसरली.
जांभुरखेडा – लेंडारी परिसरामध्ये वाघाने एका व्यक्तीस उचलून नेण्याची दिवसभर चर्चा होती. सदर चर्चेचे गांभीर्य लक्षात घेता व वन विभाग ही सक्रिय झाला होता पुराडा वनपरिक्षेत्रातील वनमजूर व वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी लेंडारी जंगल पिंजून काढल्याची माहिती आहे.

पूराडा येथील वन परिक्षेत्र अधिकारी बालाजी दीघोरे यांनी गडचिरोली न्यूज नेटवर्क सोबत दूरध्वनी वर बोलतांना सांगितले की घटना स्थळी पट्टेदार वाघ आल्याची खात्री पटली आहे. तेथे त्याचे पागमर्क मिळाले आहेत. परंतु वाघाच्या हल्ल्याची कुठलीही निशाण नसल्या मुळे वाघाच्या हल्ल्या बाबत असलेली आजची चर्चा ही निव्वळ अफवाह असल्याचे त्यांनी सांगितले.

About The Author

error: Content is protected !!