एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन जिल्हयामध्ये “जागरुक पालक, सुदृढ बालक” या मोहिमेचे मोहिमेचा शुभारंभ
1 min readगडचिरोली,(जि एन एन )दि.09:- आज 09 फेब्रुवारी रोजी एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन जिल्हयामध्ये “जागरुक पालक, सुदृढ बालक” या मोहिमेचे तसेच 7 आरोग्य संस्थांमध्ये महारक्तदान व 62 आरोग्य संस्थांमध्ये महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
“जागरुक पालक, सुदृढ बालक” या मोहिमेचा शुभारंभ प्रा.डॉ.तानाजी सावंत आरोग्य मंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्षतेखाली सकाळी 11.00 वाजता दुरदृष्य प्रणालीव्दारे करण्यात आल्यानंतर गडचिरोली जिल्हयामध्ये सदर मोहिमेचे उदघाटन राजेन्द्र भुयार, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांचे हस्ते स्कुल ऑफ स्कॉलर्स, गडचिरोली येथे करण्यात आले.
“जागरुक पालक, सुदृढ बालक” या मोहिमेमध्ये जिल्हयातील 0 ते 18 वर्ष वयोगटातील एकुण 2,92,051 मुला-मुलींची संपुर्ण आरोग्य तपासणी करण्यात येणार असून सदर तपासणी ही जिल्हयातील अंगणवाडी केन्द्र व शाळांमध्ये करण्यात येणार असून त्याकरीता जिल्हयामध्ये वैद्यकिय अधिकारी यांचे 354 पथक तयार करण्यात आलेली आहेत. आवश्यक्तेनूसार आरोग्य तपासणी करण्यात आलेल्या मुला-मुलींना पुढिल उपचारासाठी तसेच शस्त्रक्रियेसाठी वरिष्ठ आरोग्य संस्थांमध्ये संदर्भित करण्यात येणार आहे.
सदर मोहिमेमध्ये सर्व पालकांनी आपल्या मुला-मुलींची संपूर्ण आरोग्य तपासणी करुन घेण्याचे आवाहन डॉ. दावल साळवे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी केले.
सदर कार्यक्रमाकरीता राजेन्द्र भुयार, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली, डॉ. दावल साळवे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली, डॉ. अनिल रुडे, जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, गडचिरोली, डॉ. संजयकुमार जठार अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली, डॉ. स्वप्निल बेले, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली, श्रीमती अर्चना इंगोले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा परिषद गडचिरोली, राजकुमार निकम, शिक्षणाधिकारी, (माध्यमिक), जिल्हा परिषद गडचिरोली, डॉ. सचिन हेमके, सहसंचालक, कुष्ठरोग, गडचिरोली, डॉ. बागराज धुर्वे, निवासी वैद्यकिय अधिकारी, सामान्य रुग्णालय, गडचिरोली, महेन्द्र गणवीर, तहसिलदार, गडचिरोली, डॉ. सुनिल मडावी, तालुका आरोग्य अधिकारी, गडचिरोली, डॉ. माधुरी किलनाके, वैद्यकिय अधिक्षक, महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली, डॉ. राहुल थिगळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, गडचिरोली, आशुतोष लोंढे, प्राचार्य, स्कुल ऑफ स्कॉलर्स, गडचिरोली उपस्थित होते.
सदर कार्यक्रामाच्या यशस्वीतेसाठी स्कुल ऑफ स्कॉलर्स गडचिरोली येथिल विद्यार्थी व कर्मचारीवृंद तसेच आरोग्य विभाग जिल्हा परिषद गडचिरोली व सामान्य रुग्णालय गडचिरोली येथिल आरोग्य अधिकारी व आरोग्य कर्मचारीवृंद यांचे सहकार्य लाभले. असे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी कळविले आहे.