रामगड वरून देऊळगाव कडे रुग्ण पोहचवून परत जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा अपघात
1 min readसुदैवाने कुठलीच जीवित हानी व वाहनाला नुकसान न झाल्याने लोकांनी हातभार लावून सरळ केलेल्या त्याच अपघात ग्रस्त वाहनाने चालक व वाहक देऊळगाव कडे निघून गेले.
कुरखेडा; ९ फेब्रुवारी:
प्राप्त माहितीनुसार देऊळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सेवार्थ असलेली रुग्णवाहिका क्रमांक एम एच ३३ टी ३४०४ आज सायंकाळी रामगड परिसरातील रुग्णांना घरी सोडून परत जात असताना पुराड्या नजीक एका वळणावर अनियंत्रित होऊन पलटली.
झालेल्या अपघातात चालक व वाहक यांना सुदैवाने कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी यांना रुग्णवाहिकेतून बाहेर काढला व पलटलेली रुग्णवाहिका सरळ करून दिली.
सदर रुग्णवाहिका व्यवस्थित सुरू असल्याने चालक सदर वाहन घेऊन देऊळगाव कडे परत निघून गेला.
सदर घटनेबाबत कुठलीही नोंद पुराडा येथील पोलीस स्टेशनमध्ये झाली नसल्याने चालक व वाहकाचे नाव कळू शकले नाही.