भारत जोडो याञेच्या धर्तीवर हात से हात जोडो अभियान!
1 min read*युवक काँग्रेसच्या नेतृत्वात मोहल्ला बैठकिचे आयोजन*
देसाईगंज- जी एन एन ; १०.फेब्रुवारी;
देशातील नागरिकांच्या मुलभुत गरजा व समस्या जाणुन घेण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कन्याकुमारी ते कश्मिर पर्यंत पदयाञा काढण्यात आली. त्याच धर्तीवर देसाईगंज शहरा अंतग॔त नागरिकांच्या मुलभुत गरजा व समस्या जाणुन घेण्यासाठी हात से हात जोडो अभियान राबविण्यात येणार असुन यासाठी देसाईगंज शहर युवक काँग्रेसच्या वतिने मोहल्ला बैठकिचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती युवक काँग्रेस शहर अध्यक्ष पिंकु बावणे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस दिली.
येत्या काही काळात नगर परिषदेच्या निवडणुका होणार असुन मागील दहा वर्षापासून येथील नगर परिषदेत भाजपाची सत्ता आहे.माञ या दहा वर्षात सत्ताधाऱ्यांनी केलेली विकासकामे,त्याआधी झालेली विकासकामे व नागरिकांच्या गरजा, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक माहिती संकलित जाणार आहे.दरम्यान नगर परिषदेसाठी योग्य उमेदवारांची नागरिकांतुन चाचपणी करण्यात येणार असुन लोकांचा प्रतिनिधी म्हणून जनसंपर्कात राहुन नागरिकांच्या व शहराच्या सर्वांगीण विकासाचे मुद्दे मार्गी लावणाऱ्या योग्य व्यक्तिची लोकप्रतिनिधी म्हणून निवड करता यावी, हा या मागचा उद्देश असुन पक्षाची विचारधारा घराघरात पोहचवणे हा मुख्य उद्देश आहे.त्या दृष्टीने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार,जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या निर्देशानुसार सदर बैठकिचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती शहर अध्यक्ष पिंकु बावणे यांनी दिली.