April 26, 2025

“ अनेक वर्षापासुन पोलीस यंत्रणेस चकमा देत असलेले फरार/पाहिजे आरोपीतांच्या स्थानिक गुन्हे शाखेनी आवळल्या मुसक्या ”

गडचिरोली: ९ फेब्रुवारी; वर्षानुवर्ष पोलिस यंत्रणेला चाकमा देत असलेल्या फरार/पाहिजे असलेल्या अरोपितांना गडचिरोली येथील स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या असून १० पैकी ४ आरोपी संबंधित पोलिस स्टेशनच्या ताब्यात देवून ६ आरोपितांचे न्यायालयातून मुक्तता झाल्याने अभिलेखातून नाव कमी केले आहे.

पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी पोलीस घटकांच्या अभिलेखावर असणा-या फरार व पाहिजे आरोपीतांचा शोध घेवुन कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले असल्याने, गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी संपुर्ण गडचिरोली घटकात दिनांक – 01/01/2023 ते दिनांक –31/01/2023 पावेतो सर्व पोलीस स्टेशन, उपविभाग व स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली यांनी त्यांचे स्तरावर विशेष पथक तयार करुन फरार/पाहिजे आरोपीतांचा शोध घेवुन कारवाई करण्यासंबंधाने आदेशीत केले.

विशेष मोहिमेदरम्यान स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली येथे कार्यरत असणाया अधिकारी व कर्मचारी यांचे पथक तयार करुन विविध पोलीस स्टेशनचे अभिलेखावर वर्षानुवर्ष फरार व पाहिजे आरोपीतांची शोध मोहिम सुरु केली असता, पोलीस स्टेशन अहेरी येथील 06 आरोपी, पोस्टे आरमोरी 03 , आरोपी, पोस्टे मुलचेरा 01 आरोपी असे एकुण 10 आरोपी मिळुन आले.

मिळुन आलेल्या आरोपीतांपैकी 06 आरोपींची न्यायालयातुन मुक्तता करण्यात आली असल्याने

त्यांची नावे अभिलेखावरुन कमी करण्यात आली व उर्वरीत 04 आरोपी यांना पुढील कायदेशीर कारवाई

करीता संबंधित पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक श्री. उल्हास भुसारी, पोलीस उपनिरीक्षक दिपक कुंभारे, पोलीस उपनिरीक्षक राहुल आव्हाड, महिला पोलीस उपनिरीक्षक वर्षा नैताम, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक श्री. पुरुषोत्तम वाटगुरे व सर्व कर्मचारी यांनी केलेली आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!