December 23, 2024

“छत्तीसगड-महाराष्ट्र राज्याच्या सिमेलगत पोलिस-नक्षल चकमक”

1 min read

अहेरी, आनंद दहेगावकर, जीएनएन (प्रतिनिधी): १० फेब्रुवारी; उपविभाग पेंढरी अंतर्गत येणा­या पोलिस मदत केंद्र गोडलवाही हद्दीतील छत्तीसगड-महाराष्ट्र राज्याच्या सिमेलगत मौजा बोधीनटोला गावाजवळील जंगल परिसरात पोलिस – नक्षल चकमक झाली.
मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारावर अपर पोलीस अधीक्षक, अहेरी यतिश देशमुख यांचे नेतृत्वात विशेष अभियान पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना दुपारी 3.30 वा. दरम्यान सदर जंगल परिसरात 20 ते 25 अशा मोठ्या संख्येतील नक्षलवाद्यांनी पोलीस जवानांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने जोरदार गोळीबार केला.
विशेष अभियान पथकांच्या बहादूर जवानांनी प्रतिउत्तरादाखल व स्वसंरक्षणासाठी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला असता, जवानांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत पळ काढला. चकमकीदरम्यान सदर जंगल परिसरात, काही नक्षल पिठ्ठु व मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य हस्तगत करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश प्राप्त झाले.
सदर जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान आणखी सुरु असुन, शोध मोहीम सुरु आहे.

About The Author

error: Content is protected !!