ब्रेकिंग न्यूज; भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा स्वीकारला, रमेश बैस होणार महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, जाणून घ्या कोण कोण होणार राज्यपाल?
1 min read
- “भगतसिंग कोश्यारी” यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला, त्यांच्या जागी “रमेश बैस” हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असतील. त्याचप्रमाणे राधाकिशन माथूर हे लडाखचे नायब राज्यपाल असतील.
जी एन एन; प्रतिनिधी; (१२ फेब्रुवारी):
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवीन राज्यपालांची नियुक्ती केली आहे. दरम्यान, भगतसिंग कोश्यारी यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला आहे. त्यांच्या जागी रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असतील. त्याचप्रमाणे राधाकिशन माथूर हे लडाखचे नायब राज्यपाल असतील.
राष्ट्रपतींनी नवीन राज्यपालांची नियुक्ती केलेल्या राज्यांमध्ये लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक यांची अरुणाचल प्रदेशचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर लक्ष्मणप्रसाद आचार्य सिक्कीमचे राज्यपाल असतील. दुसरीकडे झारखंडच्या राज्यपालपदासाठी सीपी राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे शिवप्रताप शुक्ला यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी तर गुलाबचंद कटारिया यांची आसामच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विश्वभूषण हरिचंदन हे छत्तीसगडचे राज्यपाल असतील. आंध्र प्रदेशचे राज्यपाल निवृत्त न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर असतील. त्याचप्रमाणे, सुश्री अनुसुया उईके यांची मणिपूरच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. श्री गणेशन यांना नागालँडचे राज्यपाल तर फागू चौहान यांना मेघालयचे राज्यपाल बनवण्यात आले आहे.