“सूरजागड” येथून #लोहखनिज वाहतूक करणारा ट्रक पलटला; सुदैवाने जीवित हानी टळली!
1 min readमुरुमगाव जवळील बेलगाव येथे ट्रक अनियंत्रित होवून सिताराम गोविंदा मेश्राम यांचे अंगणात भरधाव वेगात पलटले!
धानोरा: शरीफ कुरेशी; (प्रतिनिधी): १२ फेब्रुवारी:
धानोरा तालुक्यातील मौजा मुरुमगाव येथील 1 की. मी. अंतरावर असलेले मुख्य मार्गावर बेलगाव ला आज दिनांक 11 फरवरी 2023 ला दुपारी 1:30 दरम्यान लोहखनिज वाहतूक करणारे भरधाव वेगात येत असलेला ट्रक सिताराम गोविंदा मेश्राम यांचे राहते घरात पलटला .
ट्रक सूरजागड प्रकल्पातून लोहा गिट्टी भरून रायपूर छत्तीसगढ राज्य ला निघाले होते, गडचिरोली, धानोरा, मुरुमगाव, या अंतरराष्ट्रीय माहा मार्गावर सूरजागड प्रकल्पातून शेकडो वाहने या मार्गावर भरधाव वेगात रोज नेहमीच चालतात, चालक मादक द्रव्य चा सेवन करून राहत असल्याने या मार्गावर अपघाताचे संख्या वाढत चाललेली आहे यावर नियंत्रण ठेवणे आता गरजेचे झाले आहे.
अपघात झालेल्या गाडी क्रमांक MH 34 – BZ 4140 या असून सादर ट्रक लक्ष्मी कट्रकशन कंपनी चंद्रपूर चे असल्याची माहिती आहे. प्रेमलाल विश्वकर्मा राहणार मध्यप्रदेश ट्रक चालवत होता. चालक प्रेमलाल विश्वकर्मा एकटाच ट्रक मध्ये होता. सदर घटनेत कोणतीही प्राणहानी झालेली नाही. सदर चालक मादक द्रव्यचा सेवन करून होते असे उपस्थित गावातील लोकांनी सांगीतले!
दररोज मोठ्या प्रमाणत ट्रक या मार्गावर सुरजागड येथून लोहाखनिज भरून रायपूर कडे वाहतूक करीत असतात. या अपघातात सिताराम गोविंदा मेश्राम यांचे पलंग, टाटवे, रेती, बैलगाडी, विद्युत खांब, विद्युत मिटर, चे लाखो चे नुकसान झालेला आहे.
त्याच प्रमाणे या मार्गावर छत्तीसगढ राज्यातील कोहका, व महाराष्ट्र राज्यातील सावरगाव, गजामेढी,कूलभटी, जपतलाई, काकडयेली या चालक लोक मादक द्रव्य चा सेवन करतात अशी माहिती आहे. या मार्गावर भरधाव वेगात चालत असलेल्या वाहनांवर व मादक द्रव्य चा सेवन करून गाड्या चालवण्यारा चालकांवर योग्य ती कारवाई करून रोक थाम करने गरजेचं आहे व त त्याच प्रमाणेच सबंधित विभाग व प्रशासन ला योग्य ते प्रतिबंधक उपाय योजना करण्यात यावे असे जनतेचे म्हणने आहे!