December 23, 2024

“बंगाली समाजाच्या आरक्षणासंदर्भात आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी घेतली बार्टीच्या संचालकांची भेट”

1 min read

“बंगाली समाजाच्या झालेल्या सर्वेक्षणाचे रिपोर्ट लवकरात लवकर केंद्र शासनाकडे पाठवण्यात यावे, बंगाली समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावाण्यासाठी आमदार डॉक्टर देवरावजी होळी आग्रही”

गडचिरोली; (प्रतिनिधी) १३ फेब्रुवारी: बंगाली समाजाच्या सर्वेक्षणाचा अहवाल लवकरात लवकर केंद्र सरकारकडे पाठवण्यात यावा व बंगाली समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तातडीने निकाली काढण्यात यावा अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी बार्टीचे महासंचालक डॉक्टर गजभिये यांची पुणे येथे भेट घेऊन केली.

यावेळी प्रामुख्याने निखील भारत चे महाराष्ट्र प्रदेशचे सचिव प्राचार्य श्री विधान व्यापारी, भाजपा बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, बंगाली आघाडी जिल्हा महामंत्री विधान वैद्य, तालुका महामंत्री हेमंत बोरकुटे आदी उपस्थित होते.

या भेटीदरम्यान आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी बंगाली समाजाची मागील अनेक दिवसांपासूनची असलेली मागणी अजून पर्यंत पूर्ण न झाल्याने खंत व्यक्त केली. बार्टी चे संचालक डॉ.गजभिये सर यांना भेटुन बंगाली समाजाच्या आरक्षणासंदर्भात असलेली गंभीर परिस्थिती लक्षात आणून दिली .यावेळी संचालक यांनी त्याला उत्तम प्रतिसाद देत लवकरात लवकर रिपोर्ट बनवून पाटवण्यात येईल अशी हमी दिली आणि लवकरच एक टीम गडचिरोली ला पाठवून कार्यक्रम घेण्यात येईल असेही सांगितले.

बंगाली आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सुरेश शहा यांनी या बैठकीसाठी विशेष पुढाकार घेतला होता. वेळात वेळ काढून पुणे येथे बंगाली समाजाचे काही प्रतिनिधी ला बोलवून बैठक लावल्यामुळे संपूर्ण बंगाली समाजा तर्फे माननीय आमदार डॉ देवरावजी होळी साहेब यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

About The Author

error: Content is protected !!