“50 मावळ्यांनी रक्तदानाने केला शिवरायांना अभिषेक”
1 min read“कुरखेडा येथे आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या पहिल्या दिवशी रक्तदान शिबिरात युवाकांचा उत्स्फूर्त सहभाग”
कुरखेडा; (प्रतिनिधी): १७ फेब्रुवारी:
कुरखेडा येथे उपजिल्हा रुग्णालयात येथील शिवजन्मोत्सव मंडळच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ५० युवकांनी रक्तदान करून आपले सामाजिक कार्य शिवरायांना अर्पण केले.
दोन वर्षानंतर आयोजित होणाऱ्या शिवजयंती साजरी करणे करिता येथील युवक मंडळींनी तीन दिवसीय शिवजन्मोत्सव आयोजित केला आहे. या सोहळ्याचा एक भाग म्हणून आज येथे रक्तदान शिबिर आयोजित केले होते.
या रक्तदान शिबिरात येथील युवकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत शिबिर यशस्वी केले.
ह्या शिबिरात शिवलाल हलामी, प्रणय पुस्तोडे, दीक्षित बेहार, आशुतोष दांडेकर, अनिकेत आकरे, चेतन कुमरे, प्रवीण ब्रम्हणायक, सौरभ कोडपे, चेतन दमनी, हनुमंत थोपडे, उमेश हीले, अक्षय कुमरेटी, ऋषभ कुळमेथे, अक्षय कलबांधे, अमर जाधव, अंकुश कोकोडे, नितीन चौधरी, तोमेश्वर पदा, ताहीर शेख, विशाल लांजेवार, गणेश चौधरी, अमित कोरेटी, कुंदन देशमुख, मुकेश किरंगे, नवनाथ मेश्राम, पंकज हरडे, योगेश बेहरे, समीर नंदेश्वर, मधू डोमले, हर्षल मेश्राम, प्रणय मडावी, प्रकाश कुमरे, प्रशांत हटवार, पंकज नाकतोडे, ऋतिक मडावी, गोलु चांदेवार, छगन कावळे, शोएब पठाण, अनुप जोगे, गोलू ठेलका, राहुल टेकाम, पियूष मेश्राम, विजय देशमुख, विनोद प्रधान, अक्रम पठान, मुकेश माकडे, प्रल्हाद लंजे, शिवम मांडवे, विष्णू ठाकूर, नसीर हाशमी यांनी रक्तदान करून शिवरायांना आपले सामाजिक दायित्व अर्पण केले.
सदर रक्तदान शिबिरात गडचिरोली येथील चमूने सेवा देत रक्त गोळा केले. डॉ जगदीश बोरकर यांनी शिबिरास विशेष सहकार्य केले. आयोजक मंडळाकडून ईश्वर ठाकूर, अनिकेत आकरे, सागर निरंकारी, प्रशांत हटवार, आदींनी रक्तदान शिबिराचे व्यवस्थापन व्यवस्थितपणे हाताळले.