“शिवजन्मोत्सव ; आज नृत्य, वेशभूषा व शिवभक्त शुभम प्रजापति यांचे प्रबोधनपर कार्यक्रम”
1 min readकुरखेडा; (प्रतिनिधी) १८ फेब्रुवारी;
शिवजन्मोत्सव दुसऱ्या दिवशी आज 18 फेब्रुवारी शनिवारला सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत गांधी चौक येथे “डान्स स्पर्धा” आयोजित केली असून या स्पर्धेमध्ये सर्व वयोगटातील महिला व पुरुष सहभागी होऊ शकतात.
डान्स स्पर्धा ही फक्त ऐतिहासिक गोष्टीवर अवलंबून असलेल्या नृत्याला धरून आहे. डान्स स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी शोएब पठाण 706637798 व गणेश चौधरी 7620759311 यांच्याशी संपर्क करून नोंदणी करण्या चे आव्हान केलेले आहे.
डान्स स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांकरिता करिता प्रथम पारितोषिक 3001 रुपये द्वितीय पारितोषिक 2001 रुपये व तृतीय पारितोषिक 1001 रुपये ठेवण्यात आलेला आहे.
सायंकाळी 4 ते 5.30 वाजता पर्यंत गांधी चौक कुरखेडा येथे “वेशभूषा स्पर्धा” आयोजित केली असून ऐतिहासिक वेशभूषेला अनुसरूनच पोशाख परिधान करून या स्पर्धेत सहभाग घेता येईल. सदर स्पर्धेमध्ये भाग घेण्याकरिता दीपक धारगाय 8208710001व राहुल दांडेकर 7030581169 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन केलेले आहे.
स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांकरिता करिता प्रथम पारितोषिक 3001 रुपये द्वितीय पारितोषिक 2001 रुपये व तृतीय पारितोषिक 1001 रुपये ठेवण्यात आलेला आहे.
सायंकाळी ७ वाजता गांधी चौक कुरखेडा येथे शिवभक्त शुभम प्रजापति यांचे प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित केलेले आहे. शिवरायांच्या ऐतिहासिक घडामोडींची माहिती व त्यांचे हिंदवी स्वराज्य याबाबत तपशीलवार प्रबोधन यावेळी केले जाणार असून कुरखेडा परिसरातील समस्त नागरिकांनी या क्षणाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन आयोजक मंडळांनी केलेले आहे.